पराभव अजितदादांच्या जिव्हारी!अचानक शरद पवारांच्या भेटीला

17 Jan 2026 11:46:48
पुणे,
defeat deeply affected Ajit Pawar राज्यातील २९ महानगर पालिकांचं निकाल आता स्पष्ट झालं असून, यापैकी २१ महानगर पालिकांवर भाजपसह महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. काँग्रेस हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी तीन महापालिकांवर मित्रपक्षांच्या मदतीने विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही महापालिकेवर एकहाती विजय मिळवता आला नाही.
 
 
 
affected Ajit Pawar
महापालिका निवडणुकीची घोषणा होताच अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी सर्व ताकद लावली होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार गटासोबत युतीही केली होती. मात्र या दोन्ही महापालिकांमध्ये पराभव झाल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि त्यांचा चेहरा निकालानंतर पडल्याचे दिसले. निकालाच्या दिवशी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दूर राहिले आणि काही पत्रकारांनी विचारलेले प्रश्न त्यांनी न उत्तरता दुर्लक्षित केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवामुळे त्यांच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट दिसत होते. महापालिकेच्या निकालानंतर अजित पवारांनी राजकीय हालचालींना गती दिली आहे.
 
अजित पवार बारामतीकडे रवाना झाले आहेत. येथे ते गोविंद बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत शरद पवार गटाचे माजी आमदार राजेश टोपेही आहेत. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार तडाफडकी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आलेला आहे. स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या भेटीत अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेऊ शकतात. दुसरीकडे, महापालिकेतील पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची असल्याचेही समजते. त्यामुळे अजित पवार-शरद पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0