समुद्रपूर,
drone-tiger-captured : तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात गेल्या वर्षभऱ्यापासुन मुक्कामी असलेल्या ५ वाघ परिवाराने परिसरात दहशत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आमदार समिर कुणावार जिद्दीला पेटून उठले आहेत. गेल्या आठवड्यात पहिला वाघ पकडताच वन विभागाची चमूची हिम्मत वाढली आणि आज दुसऱ्या वाघाला पकडण्यात यश आले. वाघ पकडल्याचे कळताच आ. कुणावार, नगरसेवक किशोर दिघे यांनी वन विभागाच्या चमुचे घटनास्थळी जाऊन अभिनंदन केले.

आ. समिर कुणावार यांच्या अथकच्या पाठपुरावाने पाचही वाघांना जेरबंद करण्याचे आदेश मिळाले असून यातील दोन दिवसांपूर्वी एका वाघाला डोंगरावर शिवात पिंजऱ्यात अडकविले होते तर दुसऱ्या शनिवारी ४ वाजताच्या सुमारास जंगलात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध त्याचा वाहनांने पाटलाग करून डार्ट मारून बेशुद्ध केले करून मोठ्या शीताफीने वाघाला पिंजऱ्यात अडकविले. याची माहिती मिळताच आ. समिर कुणावार यांनी खुर्सापार जंगलात जाऊन वाघाची पाहणी करून नवेगाव नागझिरा येथील रॅपिड रेस्क्यू टिम, पिपल फॉर ॲनिमल्सची वर्धा टिम व सह वनविभागाचे कौतुक केले. आ. समिर कुणावार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक तसेच वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे वाघांना जेरबंद करण्याची मागणी केली होती.त्यांच्या आग्रही मागणीमुळे वाघांच्या कुटुंबियांना जेरबंद करण्याचे आदेश मिळाले असून वनविभाग ॲक्शन मोडवर आल आहे. वाघाला जेरबंद करण्याची रणनिती आखली आहे.
उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीलाल सरोदे ,वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात या वाघांच्या कुटुंबियांच्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टिम युध्द पातळीवर काम करीत असून जंगल परिसरात शेकडो स्ट्राप कॅमेऱ्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.२ ड्रोन कॅमेरे सुध्दा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहे.५५ च्यावर अधिकारी व कर्मचारी वाघांच्या मार्गावर असून या ५ वाघांना जेरबंद करण्यासाठी रननीती आखली असून युध्द पातळीवर वाघांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.यामुळे वनविभागाच्या टिमचा गिरड खुर्सापार परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या या पाचही वाघांना जेरबंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी देखील वाघ मात्र हातात यायच नाव घेत नव्हते वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हैराण झाले होते.मात्र त्यांच्याकडून रात्रंदिवस वाघांना पकडण्याची धडपड सुरू होती आ. कुणावार स्वता रोज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुरध्वनी वरून आढावा घेत होते.यातील दुसऱ्या वाघाला पकडताच वनविभागाच्या टिमचे सुटकेचा निश्वास घेतला आहे. आता उर्वरित ३ वाघांना सुध्दा जेरबंद करण्याचा विश्वास वनविभागाच्या टिमचे व्यक्त केला आहे.