कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी २ कोटींचा निधी

17 Jan 2026 20:00:19
देवळी,
rajesh-bakane : तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोटेश्वर देवस्थान येथे २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. भाविकांच्या सोयीसुविधा वाढवणे, देवस्थानचा सर्वांगीण विकास करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे, या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. याप्रसंगी आमदार राजेश बकाने यांची उपस्थिती होती. यावेळी मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी, अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था तसेच देवस्थानाच्या सुशोभीकरणाशी संबंधित विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती देण्यात आली.
 
 

fgz 
 
 
 
यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर येरावार, सचिव विरेंद्र देशपांडे, देवळी नगरपरिषदचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, मिलिंद भेंडे, स्वप्निल खडसे, संजय बिन्नोड, मंगला चोरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
आमदार राजेश बकाने म्हणाले, कोटेश्वर देवस्थान हे केवळ धार्मिक आस्थेचे केंद्र नसून सांस्कृतिक वारसा जपणारे तीर्थक्षेत्र आहे. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि देवस्थानाचा विकास करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या माध्यमातून अशा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
 
या विकासकामांमुळे भविष्यात भाविकांची संख्या वाढून परिसरातील सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0