वीज जोडणी नसतांना कृषी पंपाचे दिले १.८४ लाखाचे देयक

17 Jan 2026 19:25:33
मानोरा, 
manora-sub-divisional-msedcl-office : शहरातील उपकार्यकारी महावितरण कार्यालयाचा कारभाराचा अनागोंदी प्रकार मानोरा तालुयात समोर आला असून, तालुयातील पिंप्री येथील शेतकरी मनोज बाबाराव पवार यांनी कृषी पंप वीज पुरवठ्यासाठी २०१६ मध्ये कोटेशनची रक्कम भरूनही ९ वर्षांत त्याला वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, शेतात खांब किंवा मीटर नसतानाही महावितरणने या शेतकर्‍याच्या हाती चक्क १ लाख ८४ हजार रुपयांचे वीज बिल दिले आहे. या प्रकारावरून संताप व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाने महावितरण कार्यालयात अधिकार्‍यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन ८ दिवसांत कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
 
 
 
jk
 
 
मानोरा तालुयातील पिंप्री येथील शेतकरी मनोज पवार यांनी २०१६ मध्ये ए.जी. शेती पंपाच्या कनेशनसाठी रीतसर कोटेशनची रक्कम भरली होती. ९ वर्षे उलटूनही त्यांच्या शेतात वीज पोहोचली नाही. शेतात विद्युत खांबही उभा करण्यात आला नाही. असे असतानाही २०१८ पासून त्यांना वीज बिल येण्यास सुरुवात झाली आणि आज ही थकबाकी १ लाख ८४ हजार रुपयांवर पोहोचली आहे. विना कनेशन एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने शेतकरी घाबरून गेला आहे. या प्रकरणाबाबत विचारणा करण्यासाठी प्रहारचे माजी तालुकाप्रमुख शाम पवार पिडित शेतकरी यांना घेऊन महावितरण कार्यालयात गेले असता उपकार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नव्हते तर इतर कर्मचार्‍यांनी निवेदन घेण्यास टाळाटाळ केल्याने शाम पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट अभियंत्यांच्या खुर्चीलाच निवेदन दिले. निवेदन देताना प्रहारचे शाम पवार, चेतन पवार, शेतकरी मनोज पवार आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0