मराठी 'आनंदवार्ता' मराठी चित्रपटासाठी .... ठरला पहिला 'सुपरहिट’

17 Jan 2026 11:26:09
मुंबई,
Krantijyoti Vidyalaya Marathi Medium मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठीचा संघर्ष प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत आहे. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांत जवळपास १५ कोटींची कमाई करत वर्षातील पहिला ‘सुपरहिट’ मराठी चित्रपट होण्याचा मान पटकावला आहे.
 

Krantijyoti Vidyalaya Marathi Medium  
हेमंत ढोमे यांच्या Krantijyoti Vidyalaya Marathi Medium  दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १४ कोटी ९० लाखांहून अधिक कमाई केल्याची माहिती निर्मात्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ २ कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या पंधरा दिवसांतच देशभरातून जवळपास १५ कोटींच्या कमाईचा टप्पा गाठत असल्याने येत्या काही दिवसांत हा चित्रपट २० कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ची कथा मराठी माध्यमाच्या एका शाळेला वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या एकत्रित लढ्यावर आधारित आहे. संवेदनशील सामाजिक विषयाला मनोरंजनाची जोड देत हा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आणि शिक्षणव्यवस्थेतील वास्तव प्रश्नांवर भाष्य करणारी ही कथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावताना दिसत आहे.
 
 
चित्रपटात सचिन खेडेकर Krantijyoti Vidyalaya Marathi Medium  यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली असून त्यांच्या प्रभावी अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेय वाघची विनोदी शैली कथेला हलकेफुलके क्षण देते, तर प्राजक्ता कोळीच्या मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि चिन्मयी सुमित यांचाही अभिनय चित्रपटाला भक्कम साथ देतो.
 
 
 
चित्रपटांशी स्पर्धा
 
 
याच कालावधीत प्रदर्शित Krantijyoti Vidyalaya Marathi Medium झालेल्या मोठ्या बजेटच्या बॉलीवूड चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. धुरंधर, इक्कीस आणि अवतार यांसारखे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असतानाही मराठी चित्रपटाने मजबूत कमाई करत प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे.मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या अभिमानाचा जागर करणारा हा चित्रपट केवळ व्यावसायिक यशापुरता मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारा ठरत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांसह कलाकार आणि निर्मात्यांनीही या यशाचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला असून मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे यश नवे पर्व ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0