अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा समर्पण दिन उद्या

17 Jan 2026 19:29:31
नागपूर,
All India Consumer Panchayat अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नागपूर जिल्हा आणि महानगराच्या वतीने रविवारी, १८ जानेवारीला आदर्श संन्यासी व योध्दा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समर्पण दिन सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केला जाणार आहे.
 
All India Consumer Panchayat
 
ग्राहक पंचायतीच्या रामदासपेठ येथील मुख्य कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात विवेकानंद केंद्राचे संचालक डॉ. विलास देशपांडे प्रमुख वक्ता राहणार आहेत. All India Consumer Panchayat अध्यक्षस्थानी जिल्हा व महानगराचे कार्यकारी अध्यक्ष संजय धर्माधिकारी, तर राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गजानन पांडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
 
कार्यक्रमात सर्व ग्राहक नागरिक बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश शिरोळे, महानगर अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, एडवोकेट स्मिता देशपांडे, All India Consumer Panchayat अशोक पात्रीकर, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, महानगर सचिव राजीव पुसदेकर, महिला प्रमुख तृप्ती आकांत, कोषाध्यक्ष श्रीपाद हरदास, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे नगर संघटक संजय धर्माधिकारी यांनी सांगितले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0