तभा वृत्तसेवा
पवनी,
Pavni Taluka, तालुक्यातील भावड येथील भगवान शंकर मंदिरातील शंकराच्या मुर्तिची तोडफोड करुन विटंबना केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक आमदारांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती हाताळली. दरम्यान उद्या या अनुषंगाने मोर्चा काढण्यात येत असल्याचे समजते.
पवनी तालुक्यात Pavni Taluka, असलेल्या भावड येथे भगवान शंकरजी देवस्थान नावाने मंदिर आहे. आज सकाळी भाविक दर्शनासाठी गेले असता त्यांना भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड केली गेली असल्याचे लक्षात आले. चेहरा आणि दोन्ही हाताला पूर्णपणे विद्रूप करण्यात आले होते. याची माहिती पसरताच ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली. यावेळी प्रचंड संताप नागरिकांमध्ये होता. लक्षात घेता अड्याळ पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले. यापुर्वीही दोनदा याच मंदिरात शंकराच्या मुर्तिची विटंबना करण्यात आली होती. तिसèयांदा हा प्रकार घडल्याने नागरिक चांगलेच संतापले.
मुर्तिची विटंबना करणाèयांना ताबडतोब अटक करा अशी मागणी त्यांनी लावून धरली. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक नुरुल हसन आणि अन्य अधिकारी दाखल झाले होते. आ. नरेंद्र भोंडेकर सुद्धा घटनास्थळी आले. यावेळी पोलिस प्रशासनासोबत चर्चा झाली. या प्रकरणातील आरोपींना ताबडतोब अटक करावी, या मागणीसाठी उद्या 18 रोजी भावड ते अड्याळ पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता हे प्रकरण कुठल्या दिशेने जाते हे पाहणे योग्य ठरेल.
वारंवार देवी देवतांच्या मुर्तींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास उद्या सकाळी 10 वाजता अड्याळ पोलिस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करू अशी आ.नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले आहे.