श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा वर्धापन उत्सव

17 Jan 2026 18:41:01
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Shri Viththal-Rakhumai Temple, तालुक्यातील लाख या गावातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराला 45 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्य वर्धापन उत्सवाचे औचित्य साधून संगीतमय श्रीरामकथा तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेण्यात आला.
 

Shri Viththal-Rakhumai Temple, 
स्व. भिकाजी महाराज भानावत यांच्या प्रेरणेतून या उत्सवास सुरवात झाली असून रथसप्तमीच्या पर्वावर पौष कृ.14 रविवार, 18 जानेवारी 2026 ते माघ शु.7 रविवार, 25 जानेवारीपर्यंत राजूदास महाराज रुडे (लिंगीकर) यांच्या अमृतवाणीतून शी विठ्ठल-रखुमाई संस्थान, लाख (खिंड) येथे होणार आहे
 
 
काकडआरती सकाळी 5 ते 6 ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 6 ते 9 होईल. तसेच रोज रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यासाठी विविध कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये रविवार, 18 जाने ला पवन महाराज लाखेकर, बोरीचंद्रशेखर, मंगळवार, 19 जानेवारीला सकाळी 8.30 से 10.3 गुलाब राऊत, 20 जानेवारीला गजानन टोम्पे, 21 जानेवारीला गजानन गव्हाणे 22 जानेवारीला अमोल ठाकरे, 23 जानेवारी मोरेश्वर गोर, 24 जानेवारी अरुण कांबळे यांचे कीर्तन होईल.रविवार, 25 जानेवारीला सकाळी 7 ते 10 भव्य मिरवणूक सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत काल्याचे कीर्तन श्याम महाराज भानावत यांचे होईल. 25 जानेवारीला महाप्रसादाचे वितरण होणार आहे. तरी वरील कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0