वाढत्या नशा, अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा

17 Jan 2026 15:47:57
गोंदिया,
drug abuse and narcotics जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ होत आहे, परिणामी युवा पिढी व्यसनाधिन होत असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. नशा, ड्रग्स, बनावट दारू व इतर अवैध पदार्थांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वात राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांना 16 जानेवारी रोजी येथील शासकीय विश्राम गृहात देण्यात आले.
 

drug 
 
 
गोंदिया शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे अंमली पदार्थांची तस्करी होत आहे. विशेषतः गांजा, ड्रग्स, कोरेक्ससारखी प्रतिबंधित औषधे मोठ्या प्रमाणावर युवकांपर्यंत पोहचविली जात आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी बनावट दारूचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. इतर राज्यातून दारू, अंमली पदार्थाच्ी तस्करी होत आहे. पोलिस कारवाया करीत असले तरी यावर प्रतिबंध घालण्यात यश आले नसल्यामुळे युवावर्ग व्यसनाधिन होत आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. ही परिस्थिती जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था, सामाजिक आरोग्यासाठी धोका निर्माण करणारी आहे.drug abuse and narcotics करीता गोंदिया जिल्ह्यात तत्काळ विशेष अँटी-ड्रग्स ड्राइव्ह राबविण्यात यावी, नशा तस्करी, अवैध दारू निर्मिती व विक्रीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदना नमूद करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भाजयुमोचे हर्ष मोदी, मनोज बोपचे, पुष्पराज जनबंधू, विक्की बघेले, इंदरजीतसिंग भाटिया, संतोष कटरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0