भंडारा,
Bhindara Municipal Corporation काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत घड्याळाच्या चिन्हावर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणारे ऍड. विनयमोहन पशिने यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातात "धनुष्य" घेताच त्यांचे नशीब उजळले आणि ते थेट पालिकेत स्वीकृत नगरसेवक झाले. पाच वेळा लोकांमधून निवडून आलेले पशिने आता स्वीकृत म्हणून पालिकेत पोहोचले आहेत.
भंडारा नगर परिषदेच्या राजकारणा गत अनेक वर्षांपासून दिग्गज म्हणून ओळखले जात असलेल्यांपैकी ऍड. विनय मोहन पशिने हे एका आहेत. त्यांना पराभूत करणे म्हणजे दिव्य असे म्हंटले जात होते. सलग 5 वेळा ते राष्ट्रवादीच्या घड्याळावर नगर पालिकेत नगरसेवक म्हणून पोहोचले. मात्र यावेळी एका सामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यानी त्यांचा पराभव केला. पशिने यांचा हा पराभव अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा होता. मात्र थेट जनतेतून पराभूत झाले असले तरी पशिने पुन्हा सभागृहात दिसणार आहेत.
अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेऊन निवडणुकीला पुढे जाणाऱ्या पशिने यांनी घड्याळाचा त्याग करून शिवसेना शिंदे गटाचे धनुष्य हाती घेतले आहे. आश्चर्य म्हणजे धनुष्य हाती घेताच त्यांचा भंडारा नगरपालिकेच्या सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आल्याने धनुष्य हात येतात नशीब फळफळले असे बोलले जात आहे. नगरपालिकेचा प्रचंड अनुभव असल्याने सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहावा या दृष्टीने शिवसेना आमदारांनी केलेली ही खेळी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वकील साहेबांची सभागृह पोहोचण्याची इच्छा इथे पूर्ण झाली आहे.