कारंजा (घाडगे),
tobacco-paan-masala-seized : पोलिस विभागाने ऑपरेशन निशाना अंतर्गत तालुयातील काजळी येथे धडक कारवाई करून ८१ किलो प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला जप्त केला. या कारवाईमुळे प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व पान मसाला विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
काजळी येथील पुरुषोत्तम ढोले हा सुगंधित तंबाखूची विक्री करून त्याची साठवणूक करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून ७७ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच ४ किलो पान मसाला असा एकूण ५० हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुरुषोत्तम ढोले याच्याविरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात सहापोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन, पोलिस उपनिरीक्षक सागर महल्ले, नितेश मैदपवार, निलेश मंडारी, दिनेश घसाड, मंगेश मिलके, अमोल मानमोडे, राहुल अमोने, समाधान पांडे यांनी केली.