कारंजा लाड,
bjp-victory-celebrations : नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कारंजा शहर भाजपाच्या वतीने जल्लोषात विजय उत्सव साजरा करण्यात आला. शहरात फटायांची आतिषबाजी, मिठाई वाटप आणि जोरदार घोषणांनी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या विजयी जल्लोषाची सुरुवात झाली. युवा नेते कौस्तुभ डहाके, भाजपा वाशीम जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे आणि शहराध्यक्ष अमित संगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटायांची आतिषबाजी करत व मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष पाहता भाजपाच्या विजयाचा आनंद सर्वत्र दिसून येत होता. यानंतर सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते आमदार सई डहाके यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी आमदार सई डहाके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सर्व कार्यकर्त्यांना पेढे वाटून विजयाचा आनंद द्विगुणित केला.
या प्रसंगी गटनेत्या शालिनी ठाकरे, नगरसेवक चंदा कोळकर, नितीन गढवाले, सच्चानंद छद्दाणी, सागर अंभोरे, अजय श्रीवास, अतुल चिमेगावे, कुसुम अघम, कांचन डेडुंळे, ज्योती राठोड यांच्यासह तालुका सरचिटणीस मयूर लळे, शहर सरचिटणीस प्रसन्ना पळसकर, अमोल रूईवाले, समीर देशपांडे, सविता काळे, निरंजन करडे, श्रेयस कदम, मंगेश कडेल, ओम गुल्हाने, सुनील जाधव, भूपेंद्र हरीहर, इरफान खान, संदीप कुर्हे,योगेश ठाकरे, नयन बलखंडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाने कारंजा शहरात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.