कारंजा लाड,
j-c-high-school : राज्य विज्ञान संस्था नागपूर , शिक्षण विभाग जि. प. वाशीम, विज्ञान अध्यापक मंड, जिल्हा मुख्याध्यापक संघ व श्री ज्ञानेश्वर माऊली विद्यालय, कोंडाळा महाली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १५ व १६ जानेवारी दोन दिवस ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

वाशीम जिल्ह्यातील सहा तालुयामधून जवळपास ७२ विज्ञान प्रकल्प सहभागी झाले होते. यामध्ये प्राथमिक विद्यार्थी गट, माध्यमिक विद्यार्थी गट, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गट, प्रयोगशाळा सहाय्यक व दिव्यांग गट यांचा समावेश होता. माध्यमिक गटातील उत्कृष्ट ३० प्रकल्पांमधून जे.सी. हायस्कूल चा पुलक दिपक आगरकर याचा माध्यमिक गटात सोलर पॅनलच्या कार्यक्षमतेत वाढ-अंतर्वक्र आरशाची कमाल हा प्रकल्प होता. या प्रकल्पाची उपयुक्तता ही विद्युत ऊर्जा निर्मितीत वाढ आणि सकाळी व सायंकाळी शेतकर्यांना वीज पंपासाठी सोलर पॅनल मधून योग्य प्रमाणात वीज मिळत नाही याकरिता या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना योग्य प्रमाणात वीज मिळून ते शेतात वॉटर पंप सकाळी व सायंकाळी चालवू शकतात. या प्रकल्पाची ही उपयुक्तता सर्वांना आवडली. दिवसभरात सकाळी व सायंकाळी सात तासापर्यंत सोलर पॅनल ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो. पुलकने प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कार्यातून वाढीव कार्यक्षमतेची नोंद घेऊन दाखवली. यासाठी पुलक आगरकर ला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तो पात्र झाला आहे.
कारंजा तालुका व विद्यालयाचा राज्यावर नावलौकिक झाला असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच विद्यालयाच्या वरिष्ठ विज्ञान शिक्षिका विद्या प्रकाश पवार यांना वाशीम जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या तर्फे विज्ञानातील प्रदीर्घ सेवेबद्दल विज्ञान जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विद्या पवार आणि पुलकच्या व प्रकल्पाचे मार्गदर्शन शिक्षक प्रकाश थेर यांच्या यशाबद्दल कारंजा एज्यकेशन सोसायटीचे सचिव अमलप्रभ चवरे , वाशिम जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत हरसुले, पर्यवेक्षक प्रशांत गंधक तसेच सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.