बजरंग दल कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ

17 Jan 2026 19:47:16
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
attack-on-bajrang-dal-activists : दिग्रस येथे बजरंग दल संयोजक विजय पुणेकर व धनंजय देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन 9 दिवस उलटूनही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जैद खान लालासहित 4 आरोपी यांना अद्याप अटक झाली नाही. मुख्य आरोपी हा इन्स्टाग्राम या ऑनलाईन स्थळावर प्रक्षोभक पोस्ट टाकत आहे. यामुळे समाजात व तक्रारदारांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
 
 
 
y17Jan-Bajrang
 
 
 
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आरोपीची जुनी पार्श्वभूमी बघितल्यास हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे. आरोपीवर जर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाही. त्यामुळे हा आरोपी परत विजय पुणेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो. तरी आरोपीला ताबडतोब अटक करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
 
 
यावेळी बजरंग दल विभाग संयोजक भूपेंद्रसिंह परिहार यांनी यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक योगीन तिवारी, विहिंपचे जिल्हा सहमंत्री विनोद सानप, विहिंप नगरमंत्री विवेक सज्जनवार, कार्तिक निकम जिल्हा सहसंयोजक बजरंग दल यवतमाळ, अजय उन्हाळे नगरसंयोजक यवतमाळ, सूरज बिसेन नगरसह संयोजक, वडगाव प्रखंड संयोजक तेजस सावनकर, शुभम मोरे, भोसा प्रखंड संयोजक राजू नाडे, रतन आण्यलवार, उज्ज्वल सैनी, सुनील धुके, उज्ज्वल केने, राम नथवानी, आर्यन सिंघवी, आकाश जयस्वाल यांच्याह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0