कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क

18 Jan 2026 15:32:21
नागपूर,
Dayashankar Tiwari विकासकामांचा प्रामाणिक धडाका, तळातील बूथ कार्यकर्त्यांद्वारे जनतेशी थेट संपर्क, प्रचाराचे सुक्ष्म नियोजन करीत भाजपाने विजय साकारला, हे विशेष.
 

BJP Nagpur election victory Dayashankar Tiwari 
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शतक गाठत सत्ता कायम राखली. विधानसभा निवडणुकीनंतर लगेच नियोजन करण्यात आले होते. यंदा 120 जागांंचे लक्ष्य ठरवून वाटचाल सुरू केली. प्राथमिक सर्व्हेक्षणात पक्षाच्या माजी नगरसेवकांबद्दल नाराजी उघड होताच अर्ध्या नगरसेवकांना नाकारत नवे चेहरे पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातही ‘आपला-परका’ झाल्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
शहरातील प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास, मतदारांची सामाजिक-राजकीय स्थिती, स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांंचे बळ यांचा सुक्ष्म विचार करून, विविध कंगोरे तपासत रणनीती ठरवली. सुक्ष्म नियोजन केले गेले.
भाजपच्या प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर सक्रिय होते. ग्रामीणमधील पदाधिकारी व कार्यकर्तेही मदतीला आले. प्रत्येक प्रभागात बूथनिहाय जबाबदाèया देण्यात आल्या. मतदारांशी थेट संवादावर भर देण्यात आला. भाजपाचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, भाजपाची केंद्रात व राज्यातही सत्ता आहे. शिवाय महापालिकेतही होती.या काळात प्रचंड विकासकामेे झाली व होत आहेत. महापौरांनी ही विकासकामे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली.
या निवडणुकीत सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जनतेशी थेट संवाद ठेवला. नितीन गडकरी यांनी 30 सभा, देवेंद्र फडणवीस यांनी 5 सभा, टॉक शो, बाईक रॅलीच्या माध्यमातून जनसंपर्क साधला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीस सभांमधून संवाद साधला. उमेदवारी वाटपावरून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटींवर दिलेला भर, घेतलेली अपार मेहनत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाराजांपैकी बहुतांश कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मतांपेक्षा भाजपा पक्ष मोठा असल्याची प्रत्यक्ष दाखवलेली निष्ठा विजयात परावर्तित झाली.
Powered By Sangraha 9.0