नागपूर,
Savitribai Phule Jayanti स्व. आनंदराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था अंतर्गत सामाजिक बांधिलकी फाउंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. शैलेश गायकवाड लिखित शिक्षणाची भरती-ओहोटी, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम लिखित ज्ञान व अभ्यासक्रम तसेच डॉ. अरविंद पुनवटकर लिखित गृहस्थ जीवनातील बुद्धत्व या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रा. डॉ. राजश्री मेश्राम व प्रा. डॉ. हृषीकेश दलाई (कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक) यांचा सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यात शिक्षण, समाज, संस्कृती, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज आदी नावाने दिले जाणारे एकूण ४४ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. Savitribai Phule Jayanti पुरस्कारार्थींची निवड संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजकुमार अवसरे (संचालक, राज्य विज्ञान संस्था, नागपूर) होते. उद्घाटन ज्ञानेश्वरदादा रक्षक यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत योगेश देवतळे, डॉ. अजित चुनारकर व डॉ. शिल्पा सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन आशाकांत गोंडाणे यांनी केले तर आभार संगीता गायकवाड यांनी मानले.
सौजन्य: डॉ. निलेश चव्हाण/ ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र