बोर व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल : पालकमंत्री भोयर

18 Jan 2026 21:58:27
* बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटन
 
वर्धा, 
Bor Tiger Reserve बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यंटकांना एक चांगली पर्यंटनाची संधी मिळेल. जैवविविधतेचे रक्षण होण्यासोबतच व्यवसायाला चालना मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी व ढगा सफारी गेटचे उद्घाटनप्रसंगी आज रविवारी ते बोलत होते. यावेळी खा. अमर काळे, आ. सुमित वानखेडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक हरविर सिंग, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक अक्षय गजभिये, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, बफर क्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रय लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, भाजपाचे नेते सुधीर दिवे आदी उपस्थित होते.
 
 
bor
 
Bor Tiger Reserve बोर व्याघ्र प्रकल्पासाठी नवरगाव या गावाचे ज्या पद्धतीने पुनर्वसन करण्यात आले होते, त्याच पद्धतीने बफर क्षेत्रात येणार्‍या मेटहिरजी, उमरविहिरी, येणीदोडका, मरकसूर व गरमसूर गावाचे पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावाच्या पुनवर्सनाच्या मंजूरीसह १०० कोटी रुपये पुनर्वसनासाठी मंजूर केले आहे. या गावांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्यासोबत येथील नागरिकांना प्रकल्पामध्ये उद्योगाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. बोर व्याघ्र प्रकल्पासोबतच कौंडण्यपूर, सेवाग्राम यासारख्या पर्यटन क्षेत्राचा सुध्दा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे असे खा. काळे म्हणाले.
 
 
Bor Tiger Reserve बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. वन विभागाने पर्यावरणाचे रक्षण करताना नागरिकांचे रक्षण करणे तेवढेच गरजेचे आहे. यासाठी पशुपालकांच्या चराईचा व पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वन विभागाने नियोजन करावे, असे आ. सुमित वानखेडे म्हणाले. वाढीव बफर क्षेत्रातील पुनर्वसीत करण्यात येणार्‍या पाच गावाचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे श्रीनिवास रेड्डी म्हणाले. प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी केले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट, बोर व्याघ्र प्रकल्पातील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे, पिपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशिष गोस्वामी, वन्यजीव प्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
वाघ दाखवण्यात भाजप नको : तिला टोला
गेल्या काही दिवसात वर्धेत पालकमंत्री विरुद्ध खासदार अशी राजकीय टोलेबाजी समाजमाध्यमावर सतत फिरत आहे. आज संधी साधत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी वाघ दाखवण्यात हा भाजपाचा तर वाघ दाखव भाजपाचा नाही तर दाखवायचा नाही असा खोचक टोला लगावला आणि हास्यचे फवारे उडाले.
Powered By Sangraha 9.0