मुंबई,
suryakumar-yadav-khushi-mukherjee भारतातील धडाकेबाज क्रिकेटर सूर्यकुमार यादवच्या बदनामीसंबंधित प्रकरणात बॉलिवूडची अभिनेत्री खुशी मुखर्जी मोठ्या अडचणीत सापडली आहे. सोशल मिडिया आणि पब्लिसिटी स्टंटसंदर्भात सुरू असलेल्या या वादातून अभिनेत्रीवर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी यांनी दावा केला आहे की, खुशी मुखर्जीने पब्लिसिटी मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी साधण्यासाठी सूर्यकुमार यादवची बदनामी केली आहे. वृत्तानुसार, फैजानने या प्रकरणात तिला विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे आणि कमीतकमी 7 वर्षांचा तुरुंगवास करण्याची मागणी केली आहे. suryakumar-yadav-khushi-mukherjee फैजान सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून, तो यादवच्या बदनामी प्रकरणात कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहे. वाद भडकल्यानंतर खुशी मुखर्जीने हात जोडले आहेत आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तिने सांगितले की, तिचे इन्स्टाग्रॅम खाते हॅक झाले होते आणि टीम इंडियाच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादवशी झालेली चर्चा फक्त साधी होती; प्रेम किंवा वैयक्तिक संबंध यात नव्हते. तिने हे स्पष्ट केले की ती कोणत्याही क्रिकेटरशी डेटिंग करत नाही आणि तिचे नाव यादवसोबत जोडले जाऊ नये.
सूर्यकुमार यादव या वादापासून दूर आहे आणि त्याची किंवा संघातील सहकाऱ्यांची याविषयी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. suryakumar-yadav-khushi-mukherjee तो आपल्या आगामी सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र फैजान आणि चाहत्यांनी खुशी मुखर्जीवर मानहानीचा दावा दाखल केला असून गाझीपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अभिनेत्री विरोधात गुन्हा नोंदवला गेला असून तिला चौकशीसाठी बोलवले जाऊ शकते. एकंदरीत, सोशल मीडिया वाद आणि पब्लिसिटीच्या खळबळीत अभिनेत्री खुशी मुखर्जीची अडचण वाढली आहे, तर क्रिकेटर सूर्यकुमार यादव या प्रकरणापासून दूर राहून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे.