विधवा महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू कार्यक्रम

18 Jan 2026 16:42:45
नागपूर,
Haldi-Kumkum ceremony दक्षिण नागपूर रिंग रोडवरील संजय गांधी नगर, प्लांट नं. २२१ येथील समाजसेविका शालिनी सव्वालाखे यांच्या घरी विधवा महिलांसाठी आगळ्या-वेगळ्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी २० जानेवारीला सायंकाळी ४:०० वाजता पार पडणार आहे.
 
Haldi-Kumkum
 
परंपरेनुसार मकरसंक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचा आनंद सर्व महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच विधवा महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि समाजात त्यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. समाजातील विधवा महिलांना आदर मिळावा आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता यावा, Haldi-Kumkum ceremony यासाठी शालिनीताई सव्वालाखे यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
 
हा कार्यक्रम सर्व विधवा महिलांसाठी, त्यांच्या मैत्रिणींसह, तसेच इतर सर्व महिलांसाठी खुला असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Haldi-Kumkum ceremony कार्यक्रमाची ठिकाणे रॉयल फर्निचर जवळच्या गल्लीत, शेंडे किराणा जवळ, प्लांट नं. २२१, श्री मार्ट जवळ आहे.

सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0