लवकरच जानेवारीचे 1500 रुपये लाडकीच्या खात्यात येणार

18 Jan 2026 13:02:50
मुंबई,
Ladki Behen Yojana राज्यातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकीमुळे हप्ता वितरणात विलंब झाला होता, पण आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून निधी वितरणाची तयारी सुरू झाली आहे.
 
 

Ladki Behen Yojana
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती, ज्यामुळे कोणतेही आर्थिक लाभ वितरण होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला, तर जानेवारी महिन्याचा हप्ता थांबवण्यात आला होता. सरकारने महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली होती. मात्र आचारसंहिता लागू असल्यामुळे जानेवारीचा हप्ता रखडला.
 
 
मुख्यमंत्र्याची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Ladki Behen Yojana यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सूचक विधान केले होते की, आचारसंहिता संपल्यानंतर महिलांना 1500 रुपयांचा हप्ता लवकरच दिला जाईल. त्यामुळे महिलांमध्ये आता त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील याची उत्सुकता वाढली आहे.राज्यात फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, आणि 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, महिलांना पुढील 18 ते 20 दिवसांत 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात मिळू शकतो.अद्याप सरकारकडून हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु प्रशासन पातळीवर आवश्यक हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत शासन आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर निधी वितरण प्रक्रिया सुरू होईल.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत देण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरली आहे, आणि यामुळे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्याची शक्यता आहे. महिलांसाठी हा हप्ता निश्चितच एक मोठा आर्थिक सहारा ठरेल.
Powered By Sangraha 9.0