* विधी सेवा महाशिबिर व योजनांचा महामेळावा
वर्धा,
Legal Services Mega Camp पूर्वी ग्रामीण भागामध्ये कष्टाचे जीवन होते. आता गावांमध्ये सुख, सोयी, सुविधा निर्माण झाल्या आहेत. या सुविधांसोबतच न्याय व योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. विधी सेवा महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकांपर्यंत न्याय व विविध योजनेचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धेच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी केले.
सेलू तालुयातील वडगाव रोडवरील किंग्स रिसोर्ट येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व योजनांचा महामेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जयंत उपाध्याय, डॉ. संजय गाठे, सेलू तालुका वकील संघाचे अध्यक्ष शैलेश सातभाई आदी उपस्थित होते.
Legal Services Mega Camp सोशल मीडियाच्या युगात माणसं जोडली जात असली तरी कौटुंबिक सुख दुरावत चालली आहे. कुठल्या न कुठल्या कारणाने कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहे. हे वाद न्यायालयात न्यायासाठी येत असतात. सोबतच इतर वाद प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने वर्षातून एकदा मेगा लोकअदालत व दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. या लोक अदालतीतून मध्यस्थीने वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येते, असे पुढे बोलतांना वृषाली जोशी म्हणाल्या.
समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, दिव्यांगांना मोफत विधी सेवा पुरविणे हा विधी सेवा प्राधिकरण कायद्याचा उद्देश असून कायद्यानुसार समाजातील या घटकांना लोककल्याणकारी कायदे व योजना संदर्भात त्यांचे कायदेशिर हक, लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्यातून प्रयत्न करण्यात येत आहे. न्याय आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यासाठी महाशिबिर हे प्रेरणादायी माध्यम आहे, असे न्या. हेमंत गायकवाड म्हणाले.
Legal Services Mega Camp आपत्ती व संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने ११२ टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला. यावर मागील वर्षी २०१७ तक्रारी प्राप्त झाल्या. कुटुंबातील वाद प्रकरणाच्या तक्रारीसाठी भरोसा सेल सुरु करण्यात आला असून या सेलकडे १ हजार ८२५ प्रकरणे प्राप्त झाले आहे. यातील ८५ टके प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभाग, कृषि विभाग, महिला व बाल विकास विभाग, महसूल विभाग आदी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी विविध योजनेचे लावण्यात आलेल्या स्टॉलचे मान्यवराचे हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. आभार विवेक देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश, अधिवक्ता, वकील, मोठ्या प्रमाणावर नागरीक व लाभार्थी उपस्थित होते.