अखेर तो नरभक्षी बिबट्या झाला जेरबंद

18 Jan 2026 21:53:23
आठ दिवसानंतर वनविभागाला यश

तिरोडा,
leopard captured. तालुक्यातील खडकी / डोंगरगाव शिवारात एका चार वर्षीय मुलावर हल्ला करून ठार करणार्‍या व तालुक्यातील डोंगराळ आणि जंगल परिसरात दहशत माजवणारा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथका आठ दिवसानंतर यश आले असून परिसरातील शेतकर्‍यांनी, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव / या गावात ९ जानेवारी रोजीसदर बिबट्याने घरातील अंगणातून एका चार वर्षीय चिमुकला हियांशला उचलून नेत ठार केले होते. तेव्हा पासूनच या गावी आणि शेजारील गावात या बिबट्याची दहशत पसरली होती. विशेष म्हणजे, त्यानंतर खडकी जवळील बुचाटोला आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याने धुमाकूळ घातला होता.
 
 
bibat
 
leopard captured. दरम्यान, १७ जानेवारी रोजी त्रूा बिबट्याला पकडण्यात वन विभागाला मोठे यश आले. अत्यंत चपळ असलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला बेशुद्धीच्या बंदुकीचा वापर करावा लागला. अखेर खडकी डोंगरगाव परिसरात या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शनिवार १७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बुचाटोला येथील परमानंद भगत यांच्या घराच्या अंगणात शिरून या बिबट्याने बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पण चिमुकल्याच्या मृत्यू नंतर गावातीलच शाळेत तळ ठोकून असलेल्या वनविभागाच्या पथकाने तातडीने या बिबट्याचा मागोवा घेतला. यावेळी बिबट्या खडकी / डोंगरगाव शिवारात असल्याचे लक्षात येताच, वनविभागाच्या तज्ज्ञ नेमबाजांनी बिबट्याचे ठिकाण गाठून त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर काही वेळातच त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. सदर बिबट्या जेरबंद होताच परिसरातील नागरीकांनी वन विभागाचे आभार व्यक्त केले असून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0