तीन वर्षांत 1 लाख 75 हजार वाहनचालकांनी ताेडले सिग्नल

18 Jan 2026 14:09:57
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur traffic शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पाेलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे शहरात सिग्नल जम्प करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाèयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट हाेत आहे. वाहतूक पाेलिसांनी सीसीटीव्ही ुटेजवरुन ऑनलाईन ई चालान करीत वाहतूक व्यवस्था सांभाळली आहे. गेल्या तीन वर्षांत 1 लाख 75 हजार156 वाहनचालकांवर सिग्नल ताेडल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 48 हजार 286 वाहनचालकांवर सिग्नल जम्पींग केल्याची कारवाई करण्यात आली आहे.
 

Nagpur traffic  
शहरातील कायदा व Nagpur traffic सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही सुरळीत करण्यासाठी पाेलिस आयुक्त डाॅ.सिंगल आणि पाेलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी सकारात्मक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध अभियानासह जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पाेलिसांनी ‘ऑपरेशन यू-टर्न’ राबवणे सुरु केले. रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणे आणि मद्यप्राशन करुन वाहन चालविणाèयांवर कठाेर कारवाई करण्यावर भर दिला. तसेच शहरातील प्रत्येक चाैकातील सीसीटीव्ही ुटेजची तपासणी सुरु केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाèया वाहनचालकांवर ऑनलाईन ई चालान पाठविण्याचा धडाका वाहतूक पाेलिसांनी सुरु केला. त्यामुळे चाैकात वाहतूक पाेलिस नसतानाही वाहनचालकाने सिग्नल ताेडला आणि भरधाव निघून गेल्यास थेट ऑनलाईन ई चालानवरुन दंडात्मक कारवाई करण्यात येत हाेती. वाहनमालकाच्या माेबाईलवर एसएमएस पाठवून दंडात्मक कारवाई झाल्याचा मॅसेज पाठविण्यात येत हाेता. तसेच काेणत्या चाैकात सिग्नल ताेडला ते ाेटाेसह ई चालन पाठविण्यात येत हाेते. वाहतूक पाेलिसांनी आक्रमक आणि कठाेर भूमिका घेतल्याचा सकारात्मक परिणाम वाहनचालकांवर पडला. त्यामुळे वाहनचालकांनीही वाहतूक नियम पाळण्यावर भर दिला. गेल्या तीन वर्षांत पावने दाेन लाखांपेक्षा जास्त वाहनचालकांनी सिग्नल जम्पींग केल्याची आकडेवारी समाेर आली आहे.
 
 

एआय बेस ट्रॅिफक सिग्नलचीही परिणाम
शहरातील अनेक Nagpur traffic चाैकात ‘एआय बेस’ वाहतूक सिग्नल लावण्यात येत आहे. मराठीत आकडे आणि सूचना त्याद्वारे दिल्या जातात. एआय बेस सिग्नल लावलेल्या चाैकातून जर वाहनचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर लगेच तांत्रिक पद्धतीचा वापर करुन दंडात्मक कारवाई केल्या जाते. तसेच चाैकातील सीसीटीव्ही ुटेजमधूनही वाहनांवर कारवाई करण्यात येते.
 
 
शहरातील वाहतूक Nagpur traffic व्यवस्था सुरळीत राहून सामान्य नागरिकांना रस्त्यावरुन वाहन चालविताना किंवा पायी चालताना त्रास हाेऊ नये, यासाठी वाहतूक पाेलिस प्रयत्न करीत असतात. वाहतूक सिग्नल ताेडणाèयांवर सीसीटीव्ही ुटेजच्या माध्यमातून ई चालान कारवाई करण्यात येते. दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- लाेहित मतानी (पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)
 
 
 
सिग्नल जम्पींगची आकडेवारी
 
- वर्ष 2023 कारवाई 62,356
- वर्ष 2024 कारवाई 64,514
- वर्ष 2025 कारवाई 48,286
Powered By Sangraha 9.0