चर्चेला फुटले तोंड आणि सुरु झाली 'जातीयवाद' चर्चा

18 Jan 2026 11:10:30
मुंबई,
A.R. Rahman हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार आणि गायक ए.आर. रहमान यांच्या मागील काही दिवसांतील विधानावर मोठा वाद उभा राहिला आहे. रहमान यांनी आपल्या कामाची कमतरता आणि त्याला 'जातीयवाद' या दृष्टिकोनातून समजून दिले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात आता गायक शान यांचा देखील समावेश झाला आहे, ज्यांनी ए.आर. रहमान यांच्या आरोपांवर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.
 
 

A.R. Rahman  
शान यांनी आपल्या A.R. Rahman  मताचे समर्थन करतांना स्पष्टपणे सांगितले की, संगीत क्षेत्रात कोणताही जातीयवाद नाही. शान म्हणाले, “मी गेल्या काही वर्षांत अनेक गाणी गायली आहेत, तरीदेखील कधी कधी मला काम मिळत नाही. पण मी याला वैयक्तिक पातळीवर घेत नाही. ही परिस्थिती प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. प्रत्येकाचे वेगळे विचार आणि आवडीनिवडी असतात. त्यामुळे संगीत क्षेत्रात जातीयवाद किंवा अल्पसंख्याक दृष्टिकोनाचा कोणताही प्रभाव नाही.”गायक शान यांनी संगीत उद्योगात कार्यरत असताना आपल्याला काय अनुभव आले यावर प्रकाश टाकला. “संगीत क्षेत्रात असा काही प्रकार घडत नाही. जर हे खरे असते तर गेल्या ३० वर्षात आपल्या तीन प्रमुख सुपरस्टार्स ज्यांनी अल्पसंख्याक समुदायातून आपला प्रवास सुरू केला, त्यांना यश मिळाले नसते. चांगले काम करा, चांगले संगीत तयार करा, आणि अशा गोष्टींबद्दल जास्त विचार करू नका. संगीताच्या निर्मितीला जात, धर्म किंवा समुदायाशी काहीच संबंध नाही,” असे शान यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 विचार करण्याची गरज नाही
यावर शान यांनी सांगितले की, संगीतकार A.R. Rahman  आणि निर्माते प्रत्येक गाण्याच्या गरजेप्रमाणे गायकांची निवड करतात. “संगीताच्या मागे एक विचार असतो आणि प्रत्येक गाण्याच्या निर्मितीमध्ये त्या गाण्याचा विचारसरणीचा प्रभाव असतो. निर्माता आणि संगीतकार हे त्यांची मते आणि गरजा पाहून निर्णय घेतात. अशा स्थितीत, इतर लोकांचे मत वेगवेगळे असू शकते. मात्र, यावर जास्त विचार करण्याची गरज नाही,” असे शान यांनी सांगितले.तसेच, शान यांनी कधीकधी लोकांच्या मतांचा खूप विचार केल्यास, त्याचा परिणाम कामावर होऊ शकतो, असेही त्यांनी मत मांडले. “लोकांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण त्यामध्ये जर आपण स्वतःला अडकवून घेतले, तर आपला कामावरचा फोकस हरवू शकतो,” असे शान यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, ए.आर. रहमान A.R. Rahman  यांनी गेल्या काही वर्षांतील हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामाच्या कमी होणाऱ्या ओघावर भाष्य करताना, "गेल्या आठ वर्षांत या इंडस्ट्रीचे समीकरण बदलले आहेत. आता निर्णय घेणारे लोक असे आहेत जे कलेशी जोडलेले नाहीत. कदाचित यामध्ये 'कम्युनल' अँगल असू शकतो, पण ते माझ्या तोंडावर कधीच आलं नाही," असे रहमान यांनी सांगितले होते.तुम्ही संगीत जगतातील जातीयवादाचा मुद्दा कसा पाहता, यावर शान आणि ए.आर. रहमान यांच्या मतांमध्ये किती फरक आहे, हे देखील एक मोठे वादविवादाचे मुद्दे बनू शकते.त्यामुळे या चर्चेवर गायक शान यांच्या शांत आणि परिपक्व प्रतिक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, संगीताच्या क्षेत्रात फक्त आणि फक्त कामाची गुणवत्ता महत्वाची आहे, जातीय किंवा इतर कोणतेही भेदभाव नाहीत.
Powered By Sangraha 9.0