कारंजा न.प. स्थायी व विषय समित्यांची निवडणूक संपन्न

19 Jan 2026 17:37:05
कारंजा लाड, 
येथील Karanja Municipal Council Committee Elections नगरपरिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुक १९ जानेवारी रोजी पार पडल्या असून या निवडणुकांमध्ये ऑल इंडिया मजलीस - ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने आपले संख्याबळ सिद्ध करत सर्वच समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केल्याप्रमाणे १९ जानेवारी रोजी नगरपरिषद कार्यालयात पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व सहाय्यक महेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थायी समिती व विषय समितींच्या निवडणूकीचा कार्यक्रम पार पडला. निवडणुकीनंतर विषय समित्यांवरील सभापतींची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
 
 
kajanja
 
Karanja Municipal Council Committee Elections पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष अ‍ॅड. फिरोज शेकुवाले, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी हुसेन जंगली पप्पूवाले, तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी शेख जाकीर इसाक यांची निवड झाली. स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य रक्षण समितीचे सभापती म्हणून खान अनिस खा बशीर खा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अहमद नदीम अहमद अनीस यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शाहीन सुभान खेतीवाले, तर उपसभापतीपदी दुर्गा हेमराज खंडारे यांची निवड झाली आहे. याशिवाय स्थायी समिती सदस्य म्हणून मोहम्मद बिलाल पुंजाणी व सच्चानंद थद्दाणी यांची निवड करण्यात आली आहे. संख्याबळा अभावी भाजपने या निवडणुकीपासून दुर राहणे पसंत केले.
 
Powered By Sangraha 9.0