झाड अंगावर कोसळून मजुर दगावला

19 Jan 2026 14:57:58
अनिल कांबळे
नागपूर ,
labourer died वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात झाड तोडत असताना मोठी फांदी अंगावर येऊन कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर अपघातात आणखी दोन कंत्राटी कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 

labour dies 
 
 
कापूस संशोधन केंद्रातल्या कृषी विकास केंद्राच्या इमारतीसमोर शनिवारी दुपारी १२.३० वाजता ही धक्कादायक घटना घडली. संघपाल महादेव भस्मे (४८) रा. जोगी नगर असे झाड अंगावर कोसळून दगावलेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. या अपघातात मनोज पाटील यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर सचिन प्रकाश बागडे यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. केंद्रिय कापूस संशोधन केंद्रात शनिवारी कृषी विकास केंद्राच्या इमारतीसमोर झाड तोडण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी परिसरात भारतीय दूर संचार निगमचे कर्मचारी देखील तुटलेल्या तारांची जोडणी करत होते.labourer died दरम्यान तोडलेले झाड हे तीन मजूर विरुद्ध दिशेला ओढत असताना झाडाची एक मोठी फांदी खाली उभ्या असलेल्या तिन्ही मजुरांच्या अंगावर येऊन पडली. यात सघपाल भस्मे यांच्या डोक्यावर झाडाचे मोठे खोड येऊन पडले. त्यामुळे संघपाल यांचा मृत्यू झाला. बागडे यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0