मालेगाव,
Accident on Malegaon-Manmad highway मालेगाव–मनमाड महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणारी पिकअप वाहनाची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. तसेच ट्रॅव्हल्समधील 20 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ पहाटे सुमारे तीन वाजता घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवले. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मालेगाव–मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत राहिली.