नागपूर,
association for industrial development असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने ‘अॅडव्हांटेज विदर्भ - २०२६ औद्योगिक महोत्सवाचे आयोजन येत्या ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रपरिषदेत दिली.
वर्धा मार्गावरील बँक्वेट हॉल, एअरपोर्ट दक्षिण मेट्रो स्टेशन येथे आयोजित पत्रपरिषदेत आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, किशोर मालवीय, एआयडीचे अध्यक्ष आशिष प्रा. अनिल सोले, प्रशांत मोहता, शाम मुंदडा, बिपेन अग्रवाल, जुल्फेश शहा,राजेश रोकडे, डॉ. विजयकुमार शर्मा, भावेश शहा, राजेश रोकडे आदींची उपस्थिती होती. खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अॅडव्हांटेज विदर्भच्या टीझरचे लोकार्पण केले.
अॅडव्हांटेज विदर्भला महत्त्व
गेल्या तीन वर्षांत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने पर्यटन, लॉजिस्टिक्स ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या धोरणाकरिता दिलेल्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या असून नागपूर विमानतळ पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळणार आहे. नागपूर स्किल सेंटरची स्थापना, गडचिरोली येथे स्वतंत्र स्टील क्लस्टरचा प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक भागीदारी बळकट करणे तसेच नागपूरमध्ये सीडीएससीओ व बौद्धिक संपदा कार्यालय स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पार्श्वभूमीवर, अॅडव्हांटेज विदर्भला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
विदर्भात उदयोन्मुख विकास केंद्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात तीन दिवस चालणार्या या औद्योगिक महोत्सवाचा उद्देश विदर्भाला भारताच्या नकाशावर एक सशक्त आणि उदयोन्मुख विकास केंद्र म्हणून स्थापित करणे हा असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना एम्पावरिंग ग्रोथ ही इंडस्ट्रीयल एक्स्पो - एमएसएमई व जिल्हास्तरीय स्टॉल्स
अॅडव्हांटेज विदर्भ अंतर्गत ३५० हून अधिक स्टॉल्सचे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यात १०० एमएसएमईचे स्टॉल्स तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांचे ४० जिल्हास्तरीय स्टॉलस असतील. याशिवाय प्रदर्शनात डिफेन्स पब्लीक सेक्टर युनिट्स, सेबी, बीएसई, एनएसई, एमसीएक्स, एनसीडीएक्स, एएमएफआय, एमएसई, एनएसडीएल, सीडीएसएल सह इतर वित्तीय संस्था, सियान अॅग्रो, सौरऊर्जा उत्पादक तसेच वस्त्रोद्योग, प्लास्टिक, खनिज, कोळसा, विमानन, लॉजिस्टिक्स, आयटी, आरोग्य, फार्मास्युटिकल्स, संरक्षण, रिअल इस्टेट, अक्षय ऊर्जा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांचा सहभाग राहणार आहे.
पेटंट गॅलरीदेखील राहणार
बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये द्विपक्षीय व्यापार बैठका घेतल्या जाणार आहे. मुख्यत: खासदार औद्योगिक महोत्सवात बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि तांत्रिक आयोजित केली जाणार असून त्यात उद्योगांतील नव्या प्रवाहांवर, आव्हानांवर आणि संधींवर चर्चा करण्यात येणार आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये २५ पेक्षा अधिक सत्रांमध्ये २२५ तज्ज्ञ वक्ते, अंदाजे ५,५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील. जागतिक गुंतवणूकदारांसोबत २० पेक्षा अधिक द्विपक्षीय व्यापार बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. हायड्रोजन इकोसिस्टम, मायनर मिनरल पॉलिसी, स्टार्टअप्स, उत्पादन आणि विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर विशेष गोलमेज चर्चा होईल.
सुमारे २० देशांतील अॅम्बेसेडर येणार
उद्घाटन सत्राला अडानी समूह संचालक जीत अडानी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी संचालक व सीईओ ऑटो व फार्मा सेक्टर राजेश जेजुरीकर, तसेच सॅफरॉनस्टेजचे संस्थापक देवेन परुळेकर तसेच, दुग्ध व संलग्न क्षेत्रांवरील चर्चासत्रांमध्ये दुग्धविकास व मत्स्यव्यवसायचे सचिव डॉ. रामास्वामी एन., इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. प्रजापती, अमृतधारा डेअरीचे संस्थापक प्रवीण भंडारी, इंदुजा मिल्कचे सीईओ सिकंदर मुलानी, सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध बिझनेस मेंटॉर, सुरेश मानशरमानी प्रेरणादायी वक्ता म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावर्षी पहिल्यांदा अॅडव्हांटेज विदर्भमध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सहभाग राहणार रशिया, चीन,ब्राझील, इजिप्त, उरुग्वे, नायजेरिया, झांबिया, व्हेनेझुएला, टोगो, गयाना, बेनिन इत्यादी सुमारे २० देशांतील अॅम्बेसेडर, व्यापार येत आहेत.
औद्योगिक व व्यावसायिक संघटनेचा सहभाग
महोत्सवाला महाराष्ट्र शासन, एमएसएमई मंत्रालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांचे सहकार्य लाभले असून लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, नागपूर हे प्रमुख प्रायोजक नागपूर विद्यापीठ, आयआयएम नागपूर तसेच विदर्भातील विविध औद्योगिक व व्यावसायिक संघटना नॉलेज पार्टनर्स आहेत.association for industrial development आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेकरिता ग्लोबल बिझनेस फोरम हे ग्लोबल पार्टनर असून नागपूर मेट्रो, एमआयडीसी, एनएमआरडीए, एनएमसी, टाटा स्टाईव्ह आणि नागपूर स्किल सेंटर हे सहयोगी भागीदार आहेत.