अनिल कांबळे
नागपूर,
bjp leader मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप नेते आणि माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या काँग्रेसचे चाचेरकरसह आठ जणांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. गणेश उफर् घुई आनंदराव चाचेकर(40), मंगेश रमेश मांगे (39), नितीन कृष्णाजी बगडे (40), अमित विजय मेश्राम (34), आशिष नामदेव भड (41), अंकुश विजय कोचे (30), रोशन दिलीप परतेकी (34), राहूल निर्भय अठरोकार (25) अशी गिट्टीखदान पोलिसांनी अटक केलेल्या 8 जणांची नावे आहेत.
गोरेवाडा भागात पैशांचे वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे उमेदवार भूषण शिंगणे दोन कार्यकर्त्यांसह त्या भागात गेले होते. शिंगणे यांना बघताच तेथे काँग्रेसचे पदाधिकारी गणेश उफर् घुई चाचेकर यांच्यासह उपस्थित 50-60 काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. यात एक सहकारी खाली पडल्याने शिंगणे त्यांना उचलण्याकरिता खाली वाकले. भूषण शिंगणे यांनाही जमिनीवर पाडून त्यांच्या चेहऱ्यावर दगडाने मारण्यात आले. चेहऱ्याचा बचाव करताना हात पुढे केले असता हातावर दगडाने मारण्यात आले. त्यांचे ओठाटले असून त्यांच्या पायावरही मारहाण करण्यात आली. शिंगणे यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी पोलिस आयुक्ताकडे भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी तिवारी यांनी केली होती.bjp leader या मारहाणीनंतर भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी हा हल्ला राजकीय सुडबुद्धीतून झाल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः शिंगणे यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली होती. शिंगणे यांच्यावर हल्ला करणाऱ्यां 8 जणांना गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. कुख्यात गणेश उफर् घुई आनंदराव चाचेकर हा अटकेत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
........