भंडारा,
Bhndara Municipal Council भंडारा नगर परिषदे द्वारा राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमे दरम्यान 60 ते 70 कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आले. शहरातील रोकडे ज्वेलर्स च्या समोर करण्यात आलेल्या अतिक्रमणासह अनेक प्रतिष्ठानच्या अतिक्रमणांचा यात समावेश आहे.
100 दिवस विशेष कृती आराख खड्याची अंमलबजावणी करताना नगरपरिषदे द्वारा ही अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खात रोड परिसरातील रस्त्यावर आलेले व वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण करण्यात आल्यानंतर आज 19 रोजी शहरातील गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक ते बस स्थानक या मुख्य मार्गावरील अतिक्रमणावर बुलडोजर चालविण्यात आला. बाजारपेठ असून अतिक्रमणामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना नगरपालिकेकडून ते काढण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही अतिक्रमण काढले नसल्याने अखेर आज नगरपालिकेने मोहीम राबविली. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले या मोहिमेत बांबूचे तात्पुरते दुकान, टिनाचे शेड, सिमेंटचे रपटे, दुकानासमोरील लावण्यात आलेले गट्टू अशा सर्व प्रकारचे अतिक्रमण काढले गेले. या मार्गावर असलेल्या रोकडे ज्वेलर्स च्या समोरील गट्टूचे अतिक्रमण आहे या मोहिमेत काढण्यात आले. यावेळी अतिक्रमण काढणाऱ्या पथकासोबत वादही घातला गेल्याचे समजते.
60 ते 70 अतिक्रमणांवर या मोहिमेत कारवाई करण्यात आली. ही मोहीम अशीच चालू राहणार असून अतिक्रमणधारकांनी असलेले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात पवन कनोजे, संकेत कोचे, मिथुन मेश्राम, सनी सोनेकर, पवन मोगरे, अंकुश हुमणे, आकाश मेश्राम, सागर रगडे, अरविंद गणवीर सहभागी झाले होते.