नगरसेवकांच्या बठैकीत नेत्यांचा ठाम विश्वास
चंद्रपूर,
Chandrapur Municipal Corporation elections भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची एकत्रित बैठक येथील एनडी हॉटेलात बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी एकमताने, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. बैठकीला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, ओबिसी नेते अशोक जीवतोडे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रासह Chandrapur Municipal Corporation elections चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, भाजप 23 तर मित्र पक्ष 1 असे एकूण 24 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. जरी हा आकडा बहुमतापासून काहीसा दूर असला, तरी काँग्रेस पक्षालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत असताना, भाजपा मात्र सर्व नेत्यासह संयुक्तपणे पुढे आल्याचे या बैठकीतून दिसले. या बैठकीत निवडून आलेले सर्व 24 नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पक्षासाठी दीर्घकाळ योगदान देणार्या जुन्या कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
Chandrapur Municipal Corporation elections बैठकीत मार्गदर्शन करताना नेत्यांनी सांगितले की, निवडून आलेले सर्व नगरसेवक पूर्ण क्षमतेने, समर्पित भावनेतून आपल्या-आपल्या प्रभागातील विकासकामे करतील. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करीत प्रत्येक नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहतील. यावेळी झालेल्या एकत्रित भाषणात नेत्यांनी स्पष्ट केले की, भाजपाचा प्रत्येक नगरसेवक हा केवळ प्रतिनिधी नसून जनतेचा सेवक आहे. पक्ष संघटना, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप एकसंघपणे काम करणार आहे. चंद्रपूर शहरात स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे.