कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस
तर किमान १३.२ अंश सेल्सिअस
नागपूर,
मकरसंक्रांतीनंतर आता Changes in temperature वातावरणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस, तर किमान १३.२ अंश सेल्सिअस होते. दिवसभर उष्ण तर रात्री थंडीमुळे पहाटे काही भागात धुके दिसून येत आहे. जानेवारी हंगामातील सर्वात कमी तापमान थेट ८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर तापमानात वाढ होऊन पारा १३ अंशांच्या पुढे गेला आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
काही भागांत थंडीचा कडाका असून काही भागांत उकाडा वाढला आहे. दरम्यान, हवामान कोरडे असून किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान वर्तवला आहे. उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांच्या प्रवाहाचा वेग कमी होत असल्याने किमान Changes in temperature तापमानात बदल होत आहे. उत्तरेकडील काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे पारा वाढत आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. २४ जानेवारीदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.