ड्रग्जतस्कराचे मध्यवर्ती कारागृह ‘कनेक्शन’

19 Jan 2026 14:39:39
अनिल कांबळे
नागपूर,
drug traffickers नंदनवनमध्ये अटक केलेल्या ड्रग्जतस्कराचे मध्यवर्ती कारागृह कनेक्शन समाेर आले. कारागृहात शिक्षा भाेगणारे कैदी अनेकदा तब्येत बिघडल्याचा बहाना करून मेडिकल-मेयाेत आराेग्य तपासणीसाठी येतात. बंदीवान येथे आल्यानंतर त्याला एकांतात गाठत गुप्तपणे गांजा पुरवणाऱ्या तस्कराला अंमली पदार्थ विराेधीपथकाने रंगेहाथ अटक केली. सूरज उफर् नव्वा प्रमाेद गजभिये (35) रा. नंदनवन झाेपडपट्टी असे या तस्कराचे नाव आहे.
 
 

ड्रग  
 
 
अंमली पदार्थ विराेधीपथकाला सूरजकडे 846 ग्रॅम गांजासह 67 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सूरजकडून गांजा मिळाल्यानंतर आराेग्यतपासणीसाठी आलेला बंदी गांजाच्या नळ्या तयार करून गुप्तांगामध्ये लपवून हा गांजा कारागृहात नेत हाेते, असे सूरजने पथकाला दिलेल्या कबुलीत सांगितले आहे. सूरज आणि त्याच्या पत्नी विराेधात यापूर्वीही पाेलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात कारवाई केली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय असलेल्या या पती पत्नीचा गुन्हेगारी इतिहास आहे. राेशन राेहनकर (30) हा आपल्याला नेहमी गांजा पुरवताे, असे सूरजने अंमली पदार्थ विराेधी पथकाला दिलेल्या जबाबात कबूल केले आहे. राजेंद्रनगरमधील हनुमान मंदिराजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास पथकाने पाळत ठेवून त्याच्यावर ही कारवाई केली. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.drug traffickers झडती घेतली असता त्याच्याकडे एम.डी. पावडर आणि गांजा सापडला. या कारवाईत पाेलिसांनी एकूण 3 लाख 76 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सूरजला पुढील तपासासाठी नंदनवन पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0