तालुक्यातील अनेक धान उत्पादक पात्र लाभार्थ्यांना सन 2024-25 हंगामातील सानुग्रह राशी अर्थात Farmers deprived of bonuses बोनस वर्ष लोटूनही मिळाला नसल्याने शेतकर्यांमध्ये शासन व प्रशासनाप्रति तीव्र संताप आहे. या संतापाचा उद्रेक केव्हाही होण्याची शक्यता नाकारा येत नाही. 15 दिवसांत बोनस राशी बँक खात्यावर जमा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पिडीत शेतकर्यांनी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात 19 जानेवारी रोजी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनानुसार शासकीय हमी भाव योजनेअंर्गत शासनाच्या अधिकृत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीनंतर रक्कम वेळेत मिळाली असताना विविध कारणे पुढे करत पात्र Farmers deprived of bonuses शेतकर्यांना वर्ष लोटूनही बोनस मिळाला नाही. परिणामी लाभार्थ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागे आहे. हा प्रकार शेतकर्यांवर अन्यायकारक व पिडवणूक करणारा असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. तालुक्यातील धान खरेदी केंद्रांवरील बोनस पात्र शेतकरी तसेच पट्टाधारक शेतकर्यांचे बोनस प्राधान्याने पंधरा दिवसांत देण्यात यावे. अन्यथा येथील तहसील कार्यालय समोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी शेखर मेश्राम, ब्रह्मदास मेश्राम, सत्यवान कुंभरे, संतोष राऊत, उमेश कुंभरे सिध्दार्थ रामटेके व अन्य शेतकरी उपस्थित होते.