गाझा शांतता उपक्रमात सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रण!

19 Jan 2026 10:27:19
वॉशिंग्टन,
Gaza peace initiative अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मध्यपूर्वेतील शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि जागतिक संघर्षांचे निराकरण करण्यासाठी भारताला महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. पत्रात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला या ऐतिहासिक आणि भव्य प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी व्यापक योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये २०-कलमी रोडमॅपचा समावेश होता. ही योजना अरब जगत, इस्रायल आणि युरोपसह सर्व प्रमुख जागतिक नेत्यांनी त्वरित स्वीकारली होती. पुढे नेण्यासाठी, १७ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या उपक्रमाचे स्वागत केले आणि ठराव क्रमांक २८०३ स्वीकारला.
 
 

Gaza peace initiative 
ट्रम्प यांच्या पत्रानुसार, आता या सर्व योजनांचे प्रत्यक्ष रूप घेण्याची वेळ आली आहे. या योजनेच्या केंद्रस्थानी पीस बोर्ड आहे, जो आतापर्यंत तयार झालेल्या सर्वांत प्रभावशाली आणि उत्पादक बोर्डांपैकी एक असेल. हा बोर्ड नवीन आंतरराष्ट्रीय संघटना आणि संक्रमणकालीन प्रशासन म्हणून कार्य करेल. पत्रात असेही सांगितले आहे की, या प्रयत्नांत प्रतिष्ठित राष्ट्रांचे नेते सहभागी होतील जे शाश्वत शांतता निर्माण करण्याची, सन्मानपूर्वक नेतृत्व करण्याची आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित व समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्याची मोठी जबाबदारी स्वीकारतील. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, लवकरच या उपक्रमासाठी आदरणीय जागतिक नेत्यांना आमंत्रित केले जाईल, ज्यामध्ये अनेक उत्कृष्ट आणि वचनबद्ध नेते सहभागी होतील.
Powered By Sangraha 9.0