मानोरा,
इंझोरी सर्कलसह मानोरा तालुयातील सर्व गावांमधील 'Gharakul beneficiaries' घरकुल लाभार्थ्यांना मागील ५ ते ६ महिन्यापासून घरकुलाचे हप्ते मिळालेले नाहीत. या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन व सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) च्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात शिवसेना उबाठा व वंचित घरकुल धारकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

'Gharakul beneficiaries' यापूर्वी १३ जानेवारी रोजी घरकुलाचे पैसे तात्काळ देण्यात यावेत यासाठी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, स्थानिक स्तरावर तसेच शासनस्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे १९ जानेवारी रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख रवी पवार यांनी घरकुल लाभार्थींना हप्ते मिळत नसल्याने ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगितले. घरकुलाचे हप्ते न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे घराचे काम अर्धवट अवस्थेत असून, काही कुटुंबांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. तात्पुरत्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणेही शय होत नसल्याने घरकुल धारक आर्थिक व मानसिक कोंडीत सापडले आहेत. या परिस्थितीची गंभीर दखल प्रशासनाने तात्काळ घ्यावी, अन्यथा शिवसेना उबाठा च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रवि पवार, देवानंद हळदे, हरीश दिघडे, आकाश हळदे, राजकुमार दिघडे, बाळू राठोड, प्रभू जाधव, विशाल राठोड, संतोष पूरी, पृथ्वीराज राठोड आदी पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहे.