लग्नसराईच्या मागणीमुळे सोन्याच्या दराने घेतली पुन्हा उसळी

19 Jan 2026 19:49:25
सोने १ लाख ४४ हजार ४४५ तर चांदीचे दर ३ लाख ३ हजार ७०१ रुपये

नागपूर,
जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईच्या मागणीमुळे Gold price increase सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून, चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. दरवाढीमुळे प्रत्येक शहरात सोने आणि चांदीचे खरेदी-विक्रीचे दर बदलले आहेत. सराफा बाजारात सोमवारी जीएसटीशिवाय सोने १ लाख ४४ हजार ४४५ , तर चांदीचे दर ३ लाख ३ हजार ७०१ रुपये असून यात जीएसटी जोडल्यास दर पुन्हा वाढतात, अशी माहिती लोंदे ज्वेलर्सचे संचालक राजेश लोंदे यांनी दिली आहे.
 
 
gold
 
मुख्यत: नवीन वर्षात Gold price increase सोन्याचे दर आणि चांदीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी या मौल्यवान खरेदीकडे पाठ फिरविली आहे. नवीन वर्षात वर्षात २४ कॅरेट सोन्याचे दर ३ टक्के जीएसटीसह ९,६०० रुपयांनी वाढले. सोन्याच्या भावात दरदिवशी होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा बाब ठरली असून ग्राहक आता १४ कॅरेट दागिन्यांची मागणी करीत आहेत. सोन्याप्रमाणे चांदीलाही झळाळी आली असून केवळ १८ दिवसांत चांदीचे दर ५६,३०० रुपयांनी वाढले. औद्योगिक चांदीला मागणी वाढल्याने दर वाढत आहे. याशिवाय बाजारपेठेत उपलब्धता कमी आहे. पुढेही दरवाढीची शक्यता असल्याची माहिती राजेश रोकडे यांनी दिली आहे.
 
 
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सराफा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.सोने व चांदीच्या दरवाढीची अनेक कारणे आहेत. जागतिक भू-राजकीय तणाव, भारत आणि चीनच्या मध्यवर्ती बँकांची सोने खरेदी, अमेरिकन डॉलरची आणि व्याजदर, जागतिक स्तरावर चांदीची औद्योगिक क्षेत्रात वाढलेली मागणी आणि कमी उपलब्धता, तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणारे सोने महाग पडत आहे. ग्राहक दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. तसेच सण किंवा लग्नासाठी दागिने खरेदी करणे महाग झाले आहे.
Powered By Sangraha 9.0