पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण सभा संपन्न
वाशीम,
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व परिणामकारक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केलेला निधी कोणत्याही परिस्थितीत व्यपगत होऊ न देता तो वेळेत व योग्य कामांसाठी वापरला गेला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वय राखून काम केल्यास विकासकामांना निश्चितच गती मिळते. पायाभूत सुविधा, शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळेल, यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व जबाबदारीने कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे Guardian Minister Dattatraya Bharne पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण सभा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ना. भरणे दुरदृश्यप्रणालीव्दारे आढावा सभेत बोलत होते. सभेला विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, आ. सई डाहाके, आ. अमीत झनक, विधानपरिषद सदस्य आ.किरणराव सरनाईक यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहाय्यक नियोजन अधिकारी संजय राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर खासदार संजय देशमुख व खासदार अनुप धोत्रे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे सभेत सहभागी झाले होते.
Guardian Minister Dattatraya Bharne सभेदरम्यान जिल्ह्यातील विविध विकास योजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सादर केली. या आढावा सभेत १४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेच्या ईतिवृत्तावरील कार्यवाहीचा अनुपालनाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटिएसपी) सन २०२६—२७ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५—२६ मधील पुनर्विनियोजन प्रस्तावांतर्गत बचत व अतिरिक्त मागणीचे प्रस्ताव सादर करून त्यावर चर्चा करण्यात आली. सभेत परवानगीने येणार्या आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले, जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा मंच असून, या माध्यमातून राबविण्यात येणार्या कामांवर शासनाच्या गाईड लाईन प्रमाणे काटेकोर अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व ओटिएसपी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने पारदर्शक व परिणामकारक कामकाज करेल.
Guardian Minister Dattatraya Bharne खासदार संजय देशमुख यांनी जिल्ह्यातील एमआयडीसी संदर्भात हळदी उद्योगासाठी स्वतंत्र प्लॉट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार श्याम खोडे यांनी मंगरूळनाथ येथील एमआयडीसीमध्ये वापरात नसलेले प्लॉट परत घेऊन ते वापरात आणण्याबाबत मुद्दा उपस्थित केला. आमदार सई डाहाके यांनी दलित वस्त्यांसाठी प्राप्त झालेला निधी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
क वर्ग तीर्थक्षेत्र श्री संत योगी अवलिया महाराज संस्थान, काळामाथा (उमरदरी), पो. जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशीम असे नाव दुरुस्त करण्यास मान्यता देण्यात आली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सूचना वेळोवेळी प्रशासनास अवगत करून द्याव्यात, तसेच जिल्हा प्रशासनानेही लोकप्रतिनिधींच्या सूचनांबाबत शंका निरसन करून समन्वयाने कार्य करावे, असे मत व्यक्त करण्यात आले.
Guardian Minister Dattatraya Bharne वाशीम शहरातील ट्रक पार्किंगची समस्या लक्षात घेता रिंग रोडच्या कामाचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सभेचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी मानले तर सभेचे संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. या बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.