IND vs NZ T20: मैदानाआधी जंगलात टीम इंडिया; नागपूरमध्ये "टायगर सफारी";VIDEO

19 Jan 2026 15:29:50
नागपूर,  
team-india-tiger-safari-in-nagpur न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका समाप्त झाल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी एकदिवसीय संघाचा भाग नसलेले भारतीय खेळाडू आधीच नागपूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी सरावासोबतच पर्यटनाचा आनंद घेतला.
 
team-india-tiger-safari-in-nagpur
 
नागपूर शहर हे केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीच नव्हे, तर वाघांच्या अधिवासासाठीही प्रसिद्ध आहे. देशाची ‘वाघांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत. team-india-tiger-safari-in-nagpur त्यामुळे येथे आलेल्या भारतीय खेळाडूंनी मोकळा वेळ मिळताच व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याचा निर्णय घेतला. टी-२० मालिकेच्या तयारीदरम्यान भारतीय संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, रवी बिश्नोई आणि रिंकू सिंग यांच्यासह काही खेळाडूंनी खुल्या जिप्सीतून व्याघ्र प्रकल्पाचा सफर केला. खेळाडूंना वाघ दर्शन करताना आणि रात्रीच्या वेळेस जंगलात मुक्काम करतानाही पाहिले गेले. या अनोख्या अनुभवाचा त्यांनी आनंद घेतला.
सौजन्य : सोशल मीडिया 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही टी-२० मालिका एकूण पाच सामन्यांची असणार आहे. पहिला सामना नागपूरमध्ये होणार असून दुसरा सामना २३ जानेवारी रोजी रायपूरमध्ये खेळवला जाईल. team-india-tiger-safari-in-nagpur तिसरा सामना २५ जानेवारी रोजी गुवाहाटीत, चौथा सामना २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथे, तर मालिकेतील अंतिम सामना ३१ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरममध्ये होणार आहे.
 
सौजन्य : सोशल मीडिया

 
Powered By Sangraha 9.0