संक्रांतीच्या पर्वावर एकल मातेचा सन्मान

19 Jan 2026 18:12:02
सावित्रीच्या लेकींचा प्रेरणादायी उपक्रम
दारव्हा, 18 जानेवारी
पतीच्या निधनानंतर समर्थपने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाèया एका माऊलीचा Makar Sankranti मकर संक्रांतीच्या पर्वावर सन्मान करून दारव्हा येथील सावित्रीच्या लेकींनी आगळावेगळा आदर्श निर्माण केला. दारव्हा येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने दरवर्षी सामुहिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरातील महिला सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्या दरम्यान सावित्रीच्या लेकींनी एक अनोखा उपक्रम राबविला. पतीच्या निधनानंतर समर्थपने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाèया माया जाधव या मातेचा शाल, मानाचं संक्रांतीचं वाण, तिळगुळ देऊन विशेष सन्मान केला. माया जाधव यांना दोन मुली व एक मुलगा आहे. आपल्या तीनही अपत्यांना चांगले शिक्षण देऊन सांभाळ करीत आहे.
 
 
y18Jan-Sankrant
 
माळी महासंघाच्या निमंत्रणावरून त्या Makar Sankranti  संक्रांतीच्या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. महिलांनी केलेल्या आदरपूर्वक स्वागताने जाधव भारावून गेल्या. प्रत्येक महिलेला आत्मसन्मानाने जगण्याच्या अधिकार असून दारव्हा येथील महिलांनी केलेला नारी शक्तीचा जागर प्रेरणादायी ठरला. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे, सुनिता शेंदुरकर, सुनिता चौधरी, कविता रहाणे, टिकेश्वरी चौधरी, साधना सडेदार, शारदा आरेकर, वर्षा काटकर, अनिता राऊत, जयश्री काळे, अर्चना बागडे, रूपाली उंबरकार, रंजना ढाकुलकर, स्वाती कोरडे, वर्षा आरेकर, ऋषाली आरेकर, पूजा बोळे, कल्पना उडाखे, लता शेंदुरकर, शारदा राऊत, पूजा आरेकर, मिरा ठाकरे, पुष्पा राऊत, शुभांगी घाटे, ज्योती चंचलकर, कीर्ती घाटे, वंदना राऊत, माया जामोदे, जया ठाकरे, प्रणाली शेंदुरकर, मिनल शेंदुरकर, चैताली राऊत, किर्ती इंगळे, वर्षा वेळूकर उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0