कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याचे काम निकृष्टच

19 Jan 2026 18:20:34
पुसद, 
माळपठारावरील Marwadi Phata to Rohda Road मारवाडी फाटा ते रोहडा या डांबरी रस्त्याचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे. या रस्त्यावर जेसीबीनेच माती मिश्रीत गिट्टीचा थर टाकल्या जात आहे. कोणत्याही प्रकारची पातळी न करता त्यावर अतिशय तुरळक असे डांबर टाकून बारिक गिट्टीची चुरी टाकण्यात येत आहे. मारवाडी फाटा ते मारवाडी गावाकडे जाणारा रस्ता अशाच दर्जाचा बनविण्यात येत असल्याने मारवाडी येथील गावकऱ्यांनी तो रस्ता बंद पाडला आहे.
 
 
y18Jan-Rastaa
 
त्यामुळे त्यापुढील रस्ता करणे सुरू आहे. परंतु हाही रस्ता अतिशय निष्कृष्टपणे बनविल्या जात आहे. याबाबत मारवाडी वरोडा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथे योग्य चौकशी करून नियमांनुसार रस्ता बनवण्यास ठेकेदारास सांगावे, असे निवेदन 16 जानेवारी रोजी दिले आहे. रस्ता योग्य न बनविल्यास गावकऱ्यांना आंदोलन करावे लागेल किंवा उपोषणास बसावे लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे.
 
 
Marwadi Phata to Rohda Road मागील काही वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून मारवाडी फाटा ते केदारलिंगपर्यंतचा रस्ता बनवण्यात आला होता. त्या रस्त्याबाबतही गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा तो रस्ता थातूरमातूर केल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. तोच रस्ता पुन्हा तशाच प्रकारे बनविल्या जात असून यावर संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. माळ पठारावरील बेचाळीस गावातील रस्ते अशाच प्रकारे बनवून केवळ बिले काढण्यात येत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

आधीच निधी अभावी ठेकेदार लोक काम करत नाहीत, रस्ता खराब होत असेल तर आम्ही लक्ष देऊन हा रस्ता चांगला बनवून देतो. या रस्त्याची संबंधित ठेकेदार हा चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
 
- उमाकांत गंगाराम कांबळे
उपविभागीय अभियंता
सा. बां. उपविभाग पुसद
Powered By Sangraha 9.0