अकोला,
meeting in mosque मनपाचा प्रभाग १६ हा खदान परिसराचा भाग आहे. या प्रभागातील मागास प्रवर्गासाठी असलेल्या ब गटात एकाच समुदयातील दोन उमेदवार एमआयएम आणि राकॉ शरद पवार गट पक्षांकडून रिंगणात होते. मात्र मत विभाजन टाळण्यासाठी उमेदवारांसह परिसरातील विशिष्ट समाजाच्या नागरिकांची मशिदीत बैठक झाली. या बैठकीत चर्चा करून चिट्ठी काढण्याचे ठरवण्यात आले. चिठ्ठी काढल्यानंतर त्यानुसार एमआयएमच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे मत विभाजन टळून राकॉ शरद पवार गटाच्या उमेदवार अमरीन सदफ सय्यद नाजिम ह्या निवडून आल्या.
हे यश मशिदीत घेतलेल्या बैठकीचे असल्याची चर्चा परिसरात आहे. मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्ष उतरले. दरम्यान प्रभाग क्रमांक १६ ब मध्ये इतर मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून एमआयएमच्या उमेदवार शमीब बी शेख रफिक व राकॉ शरद पवार गटाच्या उमेदवार अमरीन सदफ सैय्यद नाजीम यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान मतांचे विभाजन होऊ नये म्हणून खदान भागातील एका मशिदी बैठक झाली. यात दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये ज्याचे नाव निघेल तो निवडणुकीतून माघार घेईल असे ठरले. त्यानुसार एमआयएमच्या उमेदवार शमीब बी शेख रफिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. अमरीन सदफ सैय्यद नाजीम यांनी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढविली.meeting in mosque आता निवणूक निकालानंतर मशीदीत घेतलेल्या बैठकीचे फलित समोर आले आहे. या गटातून अमरीन सदर सय्यद नाझीम ह्या 6,098 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या मुस्कान पंजवानी यांचा पराभव केला. मुस्कान पंजवानी यांना 5636 तर शिवसेनेच्या वैजयंती मुलचंदानी आणि यांना 3723 मते मिळाली. मात्र अल्पसंख्यांक समाजाचे मत विभाजन टळल्याने मशिदीतील बैठकीला यश मिळाल्याची चर्चा परिसरात आहे.