शासनाला पाठवले पत्र : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
यवतमाळ,
Mukhyamantri laḍaki bahiṇ yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला रोज महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहेत. त्यांच्याकडून उपस्थित अधिकाèयांसह कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केल्या जात आहे. नाराज महिलांचे समाधान केल्या जात आहे. अखेर महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र थेट शासनाकडे पाठविले आहे. त्यामुळे ई-केवायसी लिंक केव्हा सुरु होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वर्षवयोगटातील महिलांना दीड हजार रुपये महिना दिला जातो. या योजनेत जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेक्षणात सरकारी नोकरदार, चारचाकी धारक, टॅक्सचा भरणा करणाèया तसेच एकाच कुटुंबातील तीनपेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती.
Mukhyamantri laḍaki bahiṇ yojana त्यानंतर आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी अनिवार्य केली. ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसीपूर्ण केली. तर काही महिलांनी केवायसीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला. परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही. यामध्ये केवायसीपूर्ण करणाèया बहुतांश महिलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे संतप्त महिला महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहे. लाभ बंद करण्यात आल्याची कारणमीमांसा उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या जात आहे. केवायसी पूर्ण झाल्याचे ऑनलाइन दिसत आहे. तरीसुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. शेवटी महिला व बालकल्याण विभागाने केवायसीची लिंक पुन्हा चालू करावी, असे पत्र पाठविले आहे. या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.