नागपूर,
Nagpur News संपर्क व संवाद नागपूर ग्रुपच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘१० वर्षे बेमिसाल’ हा उत्सव सोहळा कामठी रोडवरील प्राचीन श्री शिवमंदिर परिसरात उत्साहात पार पडला. यावेळी ग्रुपचे सदस्य, कुटुंबीय व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद आसुदानी, संजीवन फाउंडेशनचे डॉ. संजय उगेमुळे, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. अनुभव कथन सत्रात वक्त्यांनी ग्रुपच्या दहा वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक व संवादात्मक कार्याचा आढावा घेतला. Nagpur News संपर्क, संवाद आणि सामाजिक समरसतेसाठी हा मंच प्रभावी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संजय अग्रवाल यांनी केली, तर संचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण डबली यांनी केले. समारोप प्रसंगी आपसी परिचय सत्र व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
सौजन्य: डॉ. प्रवीण डबली, संपर्क मित्र