अनिल कांबळे
नागपूर,
traffic rules शहरात गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातात वाढ हाेऊन नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा माेठा आकडा आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 22 लाख 31 हजार 73 दुचाकीचालकांवर हेल्मेट न घातल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्यामध्ये युवा वर्गाचा माेठ्या प्रमाणात समावेश आहे.
वाहतूक पाेलिसांनी कठाेर कारवाईचा धडाका लावल्यानंतरही वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागली नाही. परिणामतः रस्ते अपघात, वाहतूक काेंडीसह शहरातील वाहतूक व्यवस्थी बिघडली आहे. प्रत्येक चाैकातील वाहतूक सिग्नलवर पाेलिस कर्मचारी तैनात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकाेरपणे पालन करणे नैतिक कर्तव्य आहे. परंतु, वाहतूक पाेलिस तैनात नसलेल्या चाैकात अनेक वाहनचालक नियम पाळता सुसाट वाहने पळवतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत हाेते. वाहतूक पाेलिसांनी वारंवार जनजागृती केली तरीही हेल्मेट न घालणाऱ्यांची संख्या बरीच माेठी आहे. सुसाट वाहने चालविल्यानंतर हाेणाऱ्या अपघातात हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांना अपघातात जीव गमवण्याचा सर्वाधिक धाेका असताे. मात्र, त्यामुळे वाहतूक पाेलिसांनी इंस्टाग्राम,फेसबुक, ट्विटर आणि रिल्सच्या माध्यमातून जनजागृती केली.तरीही अनेक वाहनचालक अजुनही हेल्मेट घालत नाही.traffic rules गेल्या तीन वर्षांत 22 लाख 31 हजार 73 दुचाकीचालकांवर हेल्मेटचा दंड ठाेठावण्यात आला. हेल्मेट न घातल्याचा काेट्यवधी रुपयांमध्ये दंड वसूल करण्यात आला. तरीही गेल्या वर्षात 6 लाख 95 हजार 615 वाहनचालकांवर हेल्मटची दंडात्मक कारवाई करण्यात आली, हे विशेष.
...............
सीसीटीव्ही तरीही नियमांचे उल्लंघन
शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत तर काही ठिकाणी ‘एआय बेस’ कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरीही हेल्मेट आणि वाहतूक सिग्नलचे उल्लंघन माेठ्या प्रमाणात हाेत आहे. यासाेबतच पाेलिस तैनात असलेल्या चाैकातून वाहनचालक ‘यू-टर्न‘ घेऊन पळून जातात. त्यामुळे पाेलिसांना अनेक हेल्मेट न घातलेले वाहनचालकावर कारवाई करता येत नाहीत.
......
नियम ताेडणाऱ्या.मध्ये सर्वाधिक तरुणी
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये तरुणी, महिला आणि युवकांचा माेठ्या प्रमाणात समावेश आहे.
अनेक तरुणी केवळ पाेलिस समाेर दिसल्यानंतरच दुचाकीच्या डिक्कीतून हेल्मेट काढून डाेक्यात घालतात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी डाेक्यात हेल्मेट घालण्याऐवजी दुचाकीच्या हँडलला अडकवून ठेेवतात. वाहतुकीचे नियम ताेडणाऱ्यांमध्ये युवा पीढी अव्वल आहे.
.........
वर्षे - हेल्मेट कारवाई
2023 - 6,42,255
2024 - 8,92,803
2025 - 6,95,615
.............
वाहतूक नियमांचे सर्वांनी काटेकाेरपणे पालन करावे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामाेरे जावे लागेल. वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी पाेलिस विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत आहेत. हेल्मेट न घालणाऱ्यांवर आणखी कठाेर कारवाई करण्यात येईल.
- लाेहित मतानी (पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)