मराठी,हिंदी सिनेसृष्टीला 'मोठा धक्का' दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड!

19 Jan 2026 14:42:29
मुंबई,
Director Nitin Borkar मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे १८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी कला दिग्दर्शकाची भूमिका पार पडली. ५७ वयाच्या नितीन यांचे निधन नेरुळच्या DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झाले. त्यांना ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर आजाराने पछाडले होते. गेल्या काही दिवसांपासून ते मृत्यूशी संघर्ष करत होते, परंतु अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांनी आपला जीव सोडला.
 

Director Nitin Borkar 
नितीन बोरकर Director Nitin Borkar यांचे निधन केवळ मराठी सिनेसृष्टीसाठीच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीसाठीही मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या कामाने अनेक सिनेमांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी सलमान खानच्या प्रसिद्ध ‘बॉडीगार्ड’ सिनेमा आणि ‘द माईटी हार्ट’ या हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले. त्याचप्रमाणे, मराठी सिनेसृष्टीतील 'दगडाबाईची चाळ', 'मी वसंतराव' आणि ‘आणि काय हवं?’ सारख्या गाजलेल्या सिनेमांसाठी देखील त्यांनी काम केले.
 
 
कला दिग्दर्शक म्हणून नितीन बोरकर यांचा सिनेसृष्टीतील ठसा अद्वितीय होता. त्यांचा सिनेमा सजवण्याचा दृष्टिकोन आणि कलात्मक तंत्रांचा वापर यांनी त्यांना सिनेमातील एक महत्त्वाचे नाव बनवले. ‘दगडाबाईची चाळ’ सारख्या सशक्त कथाभिमूलक सिनेमामध्ये त्यांचा योगदान उल्लेखनीय होते. त्यांनी ४० हून अधिक सिनेमांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले असून, त्यांच्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर एक अनोखा ठसा ठेवला.
 
 
 
 
शोकांतिका ठरली
 
 
नितीन बोरकर यांच्या Director Nitin Borkar निधनामुळे त्याच्या कुटुंबियांसाठी एक शोकांतिका ठरली आहे. एक कलेच्या क्षेत्रातील चमकते तारे अचानक निघून गेले आहेत. त्यांच्या निधनावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून, सोशल मीडिया वर त्यांच्या कलेचे आणि व्यक्तिमत्वाचे कौतुक केले आहे.नितीन यांचे निधन हे एक महत्त्वाचे दुख:द प्रसंग आहे. त्यांच्या कलेने आणि योगदानाने अनेक सिनेमे एक वेगळी ओळख मिळवली. सिनेमातील सजावट, देखावे आणि चित्रपटांच्या अनोख्या वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या कलेने अनेक चित्रपटांची शान वाढवली. त्यांच्या जाण्यामुळे एक मोठा कलात्मक धक्का सिनेसृष्टीला बसला आहे.नितीन बोरकर यांनी त्यांच्या जीवनातील शेवटच्या काळात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात त्यांनी ब्रेन स्ट्रोकच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यांनी आपल्या मित्रांना आणि सिनेसृष्टीतील सहकार्यांनाही मदतीची आवाहन केली होती. त्याच्या या अपीलला सिनेसृष्टीतील अनेक लोकांनी प्रतिसाद दिला होता, परंतु अखेर त्याच्या अडचणींचा सामना करताना त्यांचा जीव गेला.नितीन बोरकर यांच्या कलेला, त्याच्या योगदानाला, आणि त्यांच्या कामासाठी त्याच्या आठवणींना सदैव अभिवादन केले जाईल.
Powered By Sangraha 9.0