5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर,
Rescue of animals पिकअप वाहनातून अवैधरित्या वाहतूक करीत असलेल्या 15 जनावरांची पोंभुर्णा पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाई 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोंभुर्णा तालुक्यातील पोंभुर्णा ते कसरगट्टा मार्गावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेकफुटाणा ते वेळवा मार्गावर नाकाबंदी केली.

Rescue of animals यावेळी चेकफुटाणा गावाकडून एक पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबविता भरधाव पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग केला असता पोंभुर्णा ते कसरगट्टा मार्गावरी आठवडी बाजाराजवळ वाहन थांबवून एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 15 जनावरांची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी 73 हजार 500 रुपये किंमतीचे जनावरे व 5 लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण 5 लाख 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी चालक चंद्रशेखर उर्फ शेखर राजलु गादम (25) व फरार आरोपी शिनु ओलेटी (26, दोघेही रा. घोटटा, ता. राजुरा) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल ठेंगणे, हवालदार शंकर पिटलेवाड, जगदीश पिपरे, अतुल मोरे, रजनिकांत रामटेके यांनी केली.