चिखलगाव येथे मकर संक्रांतीनिमित्त सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रम

19 Jan 2026 18:30:10
वणी, 
चिखलगाव येथील धनोजे कुणबी समाज सभागृहात मकर संक्रांतीनिमित्त सामुदायिक Surya Namaskar सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज समिती कोषाध्यक्ष रामराव गोहोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक लक्ष्मण इद्दे, सुधाकर गारघाटे, वसंत उपरे, जयप्रकाश राजुरकर, प्रकाश नागतूरे, राजकुमार पाचभाई, परशराम ढुमणे, ममता श्रीवास्तव, वनीता क्षीरसागर, निता पद्दमवार उपस्थित होते.
 
 
Surynamaskar
 
पतंजली ऋषी व जगन्नाथ बाबाच्या प्रतिमेचे पूजन करुन पतंजली ऋषीची प्रार्थना सामुहिक गायन करण्यात आले. यावेळी दिगंबर गोहोकार, जयप्रकाश राजुरकर यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार 12 मंत्र व 12 क्रीयासह सामुदायिक करुन घेतले. यानंतर मार्गदर्शन सभा झाली. यात जयप्रकाश राजुरकर यांनी सूर्यनमस्कार प्रक्रियेतील सात आसने व त्याचे आपल्या शरीरास होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले, वसंत उपरे यांनी Surya Namaskar सूर्यनमस्कार मधील 12 मंत्र व त्यांचे अर्थ सांगुन आपल्या जीवनात उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.
 
 
लक्ष्मण इद्दे यांनी Surya Namaskar सूर्यनमस्कार पासुन सप्तचक्र संतुलन याबाबत मार्गदर्शन केले. सुधाकर गारघाटे व प्रकाश नागतूरे यांनी सूर्याचे आपल्या जीवनात उपयुक्तता व सूर्यनमस्कारापासून आपल्या शरीरासाठी होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दिगंबर गोहोकार यांनी केले. आभारप्रदर्शन परशराम ढुमणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगन्नाथ बाबा योग ग्रुप सदाशिवनगर व शंकरबाबा योग चिखलगाव येथील अनेक योग शिक्षक व योग साधक हजर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कवडू नागपूरे, किशोर नागपूरे, योग शिक्षक व योगसाधकांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0