स्वामी विवेकानंदांनी भारतीय साधना जगासमोर मांडली : प्रा. रामेश्वर मिश्र

19 Jan 2026 16:30:24

स्वामी विवेकानंदांचे जीवन व विचार’ यावर व्याख्यान
 
वर्धा, 
Swami Vivekananda स्वामी विवेकानंदांनी भारताची तात्त्विक परंपरा व सामाजिक पृष्ठभूमी परदेशात परिचित करून दिली. युवकांची ओळख दृढ मन आणि दृढ शरीर अशी असावी, अशी अपेक्षा होती. युवकांना जागृतीचा संदेश देत सक्रिय होण्याचे आवाहनही केले. शिकागो येथे ‘बंधूंनो आणि भगिनींनो’ या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या ऐतिहासिक भाषणाची जगभर चर्चा झाली. स्वामी विवेकानंदांनी भारतीय साधना जगासमोर प्रभावीपणे सादर केली, असे प्रतिपादन विश्वभारती विश्वविद्यालय, शांतिनिकेतन येथील सेवानिवृत्त प्रा. रामेश्वर मिश्र यांनी केले.
 
 
Vivekanand
 
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त Swami Vivekananda  ‘स्वामी विवेकानंदांचे जीवन व विचार’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते आभासी बोलत होते. याप्रसंगी डॉ. रवी कुमार, डॉ. श्रीनिकेतन मिश्र, डॉ. शैलेश कदम, डॉ. प्रदीप, डॉ. कोमल परदेशी, डॉ. रामकृपाल, डॉ. आदित्य चतुर्वेदी, बी. एस. मिरगे उपस्थित होते. 
 
 
वेदांत व उपनिषदांच्या तत्त्वांचा उल्लेख करत प्रा. मिश्र यांनी सांगितले की, रामकृष्ण मिशनची स्थापना करून स्वामी विवेकानंदांनी देश-विदेशात या विचारधारांचा प्रचार व प्रसार केला. अद्वैत वेदांतानुसार जीव आणि ईश्वर यांच्यात कोणताही भेद नाही. ‘उठा आणि जागे व्हा’ या त्यांच्या संदेशाने युवकांना प्रेरणा मिळाली. वेदांताचा जितका प्रभावी उपयोग स्वामी विवेकानंदांनी केला, तितका अन्य कुणीही केला नाही. त्यांचे चिंतन आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही मिश्र म्हणाले.
 
 
Swami Vivekananda  कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना बौद्ध अध्ययन विभागाचे प्रा. डॉ. कृष्णचंद पांडे म्हणाले की, रामकृष्ण परमहंसांचे विचार स्वामी विवेकानंदांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अद्वैत वेदांत व आर्य समाज यांचा सविस्तर आढावा घेत विवेकानंदांच्या आध्यात्मिक चिंतनावर प्रकाश टाकला. साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. अवधेश कुमार म्हणाले की, स्वामी विवेकानंद धर्माला जीवनाचा पर्याय मानत होते. चारित्र्यवान व श्रद्धावान मनुष्य घडवण्यावर त्यांनी विशेष भर दिला, असेही त्यांनी सांगितले. संचालन डॉ. कृष्णचंद पांडेय यांनी तर प्रा. अवधेश कुमार यांनी आभार मानले. याप्रसंगी कुलसचिव कादर नवाज खान, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गादेवार, प्रा. दिगंबर तंगलवाड, डॉ. मनोजकुमार राय, डॉ. शंभू जोशी, डॉ. प्रियंका मिश्रा, डॉ. विपीनकुमार पांडे, डॉ. अंजनी राय, राजेश अरोडा आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0