अनिल कांबळे
नागपूर,
rotten betel nuts उपराजधानीतील पाच सुपारी व्यावसायिकांच्या 20 हून अधिक प्रतिष्ठानांवर शुक्रवारी 24 तासांहून अधिक काळ झडती घेत केंद्रीय आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी कसून चाैकशी केली. काेट्यवधींच्या कर चाेरी प्रकरणात बेहिशेबी उलाढालीशी निगडीत कच्च्या व्यवहारांची कागदपत्रे पथकांच्या हाती लागले आहेत.कच्च्या नाेंदीच्या या उलाढालीत अनेक व्यापाऱ्यांची नावे समाेर आल्याने सुपारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
एकट्या नागपूर शहरात 150 हून अधिक सुपारी व्यावसायिक आहेत. त्यात आयकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी नागपुरात झडती घेण्यापूर्वी सर्वांत माेठे सुपारी व्यापारी राजू अन्ना याला नवी दिल्लीतून अटक केली हाेती. त्या नंतर आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी रात्रीपासून झड़ती सुरू केली. ती शनिवारी रात्रीपर्यंत सलग 24 तासांहून अधिक चालली. या झडतीत आसिफ कलिवाला, गनी खान, कळममनातील व्यापारी राजू अन्ना सनई, हाजी अशरफ दलाल, आणि राजेश चिनाॅय या पाच सुपारी व्यावसायिकांचे दुकान, घर आणि गाेदामातील कागदपत्रे पथकांनी जप्त केली.
फुकट नगर, शांती नगर, मस्कासाथ, महेश नगर, सराा ओळी परिसरातील 20 ठिकाणी हे छापे पडले. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही व्यापारी पथकाच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे वाडी भागातील अग्रवाल, इतवारीतील गाेयल आणि वडधाना येथील सुपारी व्यापाऱ्यांचा चाेचलाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आयकर विभागाची कधीही कारवाई हाेऊ शकते, या धास्तीने सुपारी अनेक व्यावसायिकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. काही व्यापाऱ्यांनी केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथील ट्रेडर्सकडे नाेंदवलेला कच्चा खरेदी व्यवहार तात्पुरता थांबवला आहे. नागपुरातील सुपारी व्यावसायिक दक्षिण भारतातील श्रीशैलम येथील राजा ट्रेडर्स, टुक्कुगुडा, महेमुबनगर, केरळमधील माेगुल ट्रेडिंग, एर्नाकुलम, काेझाेकाेड आणि कर्नाटकातील व्यंकय्या, गणेशप्रसाद ट्रेडर्सकडून खरेदी करतात. आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी केलेल्या छापे सत्रामुळे व्यापाऱ्यांनी पुढील उलाढाल थांबवल्याची माहिती आहे. शहरातील सुपारी व्यावसायिकांची कळमना, वाडी, वडधामना, पारडी येथे गाेदामे आहेत.rotten betel nuts त्यामुळे आयकरच्या छाप्यानंतर या गाेदामांमध्ये माेठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
.....
चाेचलाल पुन्हा रडारवर ?
काही दिवसांपूर्वी जुगार अड्डे आणि क्रिकेट बुकींकडून फंड’ जमा करणारा चाेचलाल पुन्हा एकदा रडारवर आला आहे. माेठमाेठ्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने मनमाेकळेपणाने वावरणाऱ्या चाेचलालने वरिष्ठांसह अन्य काही महाभागांसाठी वसुली करीत असल्याची चर्चा आहे. सुपारी व्यावसायिकांवर छापे पडल्यानंंतर त्यानेही शहराबाहेर पळ काढल्याची माहिती समाेर आली आहे.
........